शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

हाजीरा ते सेंधवा रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : गुजरातमधील हाजीरा बंदर ते मध्यप्रदेशातील सेंधवा जंग्शनपर्यंतच्या ३०९ किलो मीटर प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : गुजरातमधील हाजीरा बंदर ते मध्यप्रदेशातील सेंधवा जंग्शनपर्यंतच्या ३०९ किलो मीटर प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे लाईनचा नकाशा व त्यात समाविष्ट शहरांची यादी सद्या जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत आली असून, या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम त्वरित होण्यासाठी पाठपुरावा व्हावा, अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.गेल्या चार ते पाच दिवसापासून व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियावर प्रस्तावित हाजिरा जंग्शन ते मांडवी मार्गे महाराष्ट्रातून थेट मध्यप्रदेशातील सेंधव्यापर्यंत रेल्वेलाईन टाकण्यात येणार आहे. तसा नकाशादेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यासाठी केंद्रसरकारतर्फे कुठलीही नोटीफिकेशन काढण्यात आलेली नाही किंवा रेल्वेविभागानेदेखील जाहिरात दिलेली नाही, असे असताना असा नकाशा टाकून बनवाबनवी केली जात आहे की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.संबधित प्रस्तावित नकाशात हाजिरा ते सेंधवा या ३०९ किलोमीटरच्या रस्त्यावर रेल्वेलाईन टाकली जाणार असून, यासाठी तीन हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारी ही रेल्वेलाईन असणार असून, हाजीरा-गोठण-कठोर-बोधन-मांडवी-उमरपाडा-देवमोगरा-सागबारा-सेलंबा-अक्कलकुवा-तळोदा-शहादा-खेतीया व सेंधवा अशी ही प्रस्तावित रेल्वे लाईन असणार आहे. त्यामुळे ट्रायबल झोनला फायदा होणार असून, दुर्गम अतिदुर्गम व अविकसित भागाचाही विकास होणार आहे.या रेल्वे लाईनमुळे परिसरातील दोन कोटी लोकांना नोकरी व रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रेल्वेलाईनला धार्मिक स्थळे जसे रामेश्वर-देवमोगरा व सेंधवा ही तिर्थक्षेत्रे विकसित होतील व त्यामुळे सुद्धा रोजगार उपलब्ध होतील. तापी व नर्मदा या नद्यांच्यामधून ही रेल्वेलाईन टाकली जाणार असून, मोठ-मोठ्या पुलांची निर्मिती करावी लागणार नाही. कारण नर्मदेच्या नदीवर आधीच पुलांची निर्मिती करण्यात आलेली असून, त्यावरुन वाहतुक सुरूच आहे.ही रेल्वेलाईन ब्रॉडगेज एकेरी असणार असून, मनमाड-धुळे-इंदौर या लाईनीला सेंधवा जंग्शनला जोडली जाणार आहे. मनमाड-धुळे-इंदौर या रेल्वेलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून, कामाला प्रारंभ झाला आहे. तर हाजिरा ते सेंधवा हा मार्ग प्रतावित असल्याचे नकाशात दाखविण्यात आलेले आहे. जर का ही रेल्वेलाईन टाकण्यात आली तर नंदुरबार जिल्हा दोन्ही बाजुंनी रेल्वे ट्रॅकने जोडला जाईल व त्यामुळे व्यापार उद्योगासाठी जिल्ह्याचा उत्तर भाग भरभराटीला येऊ शकेल.या रेल्वेट्रॅकमुळे अक्कलकुवा, तळोदा व शहादा या तिन्ही तालुक्यात व्यापारासाठी पोषक वातावरण निर्मिती होऊ शकणार आहे. गुजरातेतील सुरत, अंकलेश्वर, अहमदाबाद, बडोदा या शहरांमध्ये रेल्वेद्वारे कमी भाड्यात मालाचीने-आण करणे सोयीचे होणार आहे तर मध्यप्रदेश राज्यातील सेंधव्यापर्यंत रेल्वेलाईन जोडल्या गेल्यानंतर इंदौर व इतर शहरांमध्ये मालाची ने-आण करणे शेतकरी व व्यापारी या दोघांसाठी सोयीचे होणार आहे. गुजरातेतील नोकरदारासाठी एस टी बसच्या प्रवासापेक्षा स्वस्त व कमी वेळात प्रवास होणार असल्याने सर्वांनाच आता हा प्रस्तावित रेल्वेमार्ग हवा हवासा वाटू लागला आहे. हा रेल्वेमार्ग होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.