लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह परिसरात बुधवारी व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहादा शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांमधील पाणी शहरातील विविध भागात पसरून नवीन वसाहत व शहरातील डोंगरगाव रोड परिसरात गुडघाभर पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला होता.शहरातील पटेल रेसिडेन्सी चौक, दर्गा परिसर, विश्रामगृह चौक, दोंडाईचा रस्ता, सदाशिव नगर, रामदेवबाबा नगर, साईबाबा नगर आदी परिसरातील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शनिवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नवीन वसाहतीतील साठलेले पाणी कमी होत असून नवीन जनजीवन पूर्वपदावर येत आहे. डोंगरगाव रस्त्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व याच परिसरात मोठे व्यापारी संकुल असल्याने त्यांच्या तळघरात पाणी साचले होते. ते पाणी खाली करण्यासाठी नागरिकांना डिङोल पंपाचे सहाय्य घ्यावे लागत आहे. या पंपाच्या सहाय्याने तळघरातील पाणी खाली करण्यात येत आहे. घरे व दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सारंगखेडा परिसरातपंचनाम्यांना गती द्यावीसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. येथील कृषी सहायक के.डी. नाईक हे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. या पंचनाम्यांसाठी कृषी व महसूल विभागाने जास्त कर्मचारी नेमून पंचनाम्याच्या कामांना गती द्यावी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांनी केली आहे.असलोद येथे 20 घरांच्यानुकसानीचे पंचनामेअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद परिसरात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. असलोद गावात 20 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी सुरेखा राठोड यांनी केले. तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी काठावरील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दुधखेडा गावालगत फरशी तुटल्याने दोन दिवस वाहतूक बंद होती. असलोद येथील जलवाहिनी तुटल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल झाले. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. दुधखेडा धरण पूर्ण भरले आहे. असलोद परिसरातील इतर गावांमध्येही घरांची पडझड झाली असून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. मात्र शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने ते करण्याची मागणी होत आहे.