नंदुरबार : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नंदुरबार शहरातील कल्याण केंद्रांतर्गत एसटी आगारात कामगारांचा जनजागृती मेळावा घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी आगार प्रमुख निलेश गावीत उपस्थित होत़े प्रसंगी सहायक वाहतूक अधिक्षक रविंद्र जगताप, वर्कशॉप असिस्टंट वाय़एस़शिवदे, इंटक संघटनेचे सल्लागार रविंद्र भालेराव पाटील, सचिव आऱओ़बैरागी, जी़एस़ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े मेळाव्यात कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात आली़ यात एमएससीआयटी योजना, शिष्यवृत्ती योजना, पाठय़पुस्तक योजना, असाध्य रोग, सहायता योजना यांची माहिती त्यात सहभागी होण्याबाबत सांगण्यात आल़े कामगारांच्या विविध समस्या जाणून घेत केंद्र संचालक दिलीप शिंपी यांनी मार्गदर्शन केल़े कामगारांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केल़े यावेळी आगारातील चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचा:यांची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी कामगार कल्याण मंडळ आणि एसटी कामगारांनी परिश्रम घेतल़े
नंदुरबार आगारात कामगार कल्याण मंडळाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:56 PM