लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील भालेर, न्याहली, आसाणे, होळतर्फे हवेली, बिलाडी, तलवाडे खुर्द, अंबापूर या गावांमधील प्रतिनिधींसाठी शनिवारी ठाणेपाडा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच भारती देवमन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच काशीनाथ पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवमन पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, माजी सरपंच काशीनाथ पवार, ग्रामविकास अधिकारी विजय होळकर व ग्रामस्थ उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक सुखदेवराव भोसले यांनी सांगितले की, फाऊंडेशन ही संस्था जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणा:या वेगवेगळ्या गावांमध्ये सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे आयोजन करीत आहे. 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान स्पर्धेचा कालावधी राहणार आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षीस 75 लाख रुपये, दुसरे बक्षीस 50 लाख रुपये व तिसरे बक्षीस 40 लाख रुपयांचे असून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम कामगिरी करणा:या गावाला 10 लाखाचे रोख बक्षीस दिले जाईल. राज्यातील 75 गावांमध्ये ही खुली स्पर्धा आहे. त्यात नंदुरबार व शहाद्याच्या समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. देवमन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. संपूर्ण जगात आज पाण्याची भीषण टंचाई निर्माण निर्माण झालेली आहे. पाण्यामुळेच तिसरे महायुद्ध होणार असल्याचे बोलले जाते. सर्वच जण पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. म्हणून गावाचा ख:या अर्थाने विकास साध्य करायचा असल्यास सर्वानी पाणी बचतीला महत्त्व देण्याची गरज असल्याचे मत या कार्यशाळेत मांडण्यात आले.कार्यशाळेसाठी उत्तर महाराष्ट्र व्यवस्थापक दयानंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेवराव भोसले, महानंद मोरे, सीमा पाडवी, उज्वला काळे, सुनील वाघ, चंद्रभान खेताळे, नीलेश पगारे, सुरेश पावळे, राहुल गोवडे आदी प्रय} करीत आहेत.
पाणी फाऊंडेशनतर्फे ठाणेपाडय़ात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:43 PM