मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही 40 टक्के शौचालयांचे उद्दीष्ट बाकी आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसार आणखी जोमात व्हावा यासाठी जिल्हा परिषदेने पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व काही कर्मचा:यांसाठी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या खास शो चे आयोजन केले होते. परंतु पदाधिका:यांनीच त्याकडे पाठ फिरविल्याने मार्च 2018 अखेर जिल्हा हगणदारीमुक्त कसा होणार हा प्रश्नच आहे.जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वच स्थरातून प्रय} सुरू आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदांना उद्दीष्ट देखील ठरवून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या विषयाला प्राधान्य दिलेले असल्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने हा विषय ऐरणीवर आहे. हीच बाब लक्षात घेता मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रय} सध्या विविध माध्यमातून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी अक्षय कुमार यांचा गाजत असलेल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या शोचे नंदुरबारातील अमर चित्रमंदीरात आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ कर्मचा:यांनी मोठय़ा प्रमाणावर घेतला, परंतु जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनीच पाठ फिरविल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी आदेशजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबतचा आदेश काढला होता. सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्यासह सर्व पंचायत समिती सभापती, सदस्य, विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय विभागप्रमुख, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, सर्व शाखा अभियंता, सर्व बीआरसी, सीआरसी कर्मचारी, ग्रामलेखा समन्वयक, पाणी गुणवत्ता सल्लागार , जिल्हा व तालुकास्तरावरील कक्ष अधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्यासाठी हा खास शो आयोजित करण्यात आला होता. अनेकांची दांडीया शो साठी आदेश काढूनही अनेकांनी दांडी मारल्याचे चित्र होते. सदस्यांमध्ये देखील अनेकजण गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यातच रविवारी एमपीएससीची परीक्षा असल्यामुळे काही जणांना तेथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यातच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी देखील काही कर्मचारी व अधिका:यांना सकाळीच विशेष कामासाठी बोलविले होते. पोळ्यासाठी अनेकजण गावी गेल्याने ते देखील येऊ शकले नसल्याची स्थिती होती.अनेकजणांना जागाच नाहीअमर चित्रपट गृहात एकुण बाल्कणी व अपर क्लास असे मिळून एकुण 693 आसन क्षमता असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सीईओंच्या आदेशात 800 जणांना या शोसाठी बोलविण्यात आले होते. जे लवकर आले त्यांना आसन मिळाले, मात्र उशीराने आलेल्यांना उभे राहूनच चित्रपटाचा आनंद घेता आला.या उपक्रमाचे संयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी व स्वच्छता मिशनच्या कर्मचा:यांनी केले
‘टॉयलेट..’कडे पदाधिका:यांची पाठ
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: August 21, 2017 11:04 AM
जिल्हा परिषद : चित्रपटाच्या विशेष शो ला अधिकारी व कर्मचा:यांचीच केवळ उपस्थिती
ठळक मुद्दे कसा होणार हगणदारीमुक्त जिल्हा.. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांच्या माध्यमातून स्वच्छतेची जागृती आणि प्रचार, प्रसार होणे आवश्यक असतांना त्यांनीच या ‘शो’कडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. जिल्हा परिषद अध्यक्षाच केवळ हजर होत्या. इतर पदाधिका:यांनी पाठ फिरवि जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिका:यांचा फतवा एकीकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढलेला असतांना दुसरीकडे प्राथमिक शिक्षणाधिकारींनीही आदेश काढून सर्व गट शिक्षण अधिकारी, आस्था लिपीक, ऑपरेटर यांना सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेत बोलविले होते. मार्च अखेर हगणदारीचे जिल्ह्यात उद्दीष्ट 4मार्च 2018 अखेर जिल्हा संपुर्ण हगणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात दोन लाख 57 हजार शौचालयांचे टार्गेट होते. त्यापैकी 63 हजार 368 शौचालय आधीच होते. 88 हजार 298 नव्याने बांधण्यात आले. एकुण एक