चिनोदा : विश्वात सर्वत्र शांतता नांदून, सर्वाचे मंगल असा संदेश तळोद्यातील गो़हू़महाजन न्यू हायस्कूलच्या 200 विद्याथ्र्यानी पेंटींग फॉर पीस या उपक्रमाद्वारे दिला़ विश्वशांतीचा संदेश देताना कल्पकपणा मनी ठेवत विद्याथ्र्यानी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले होत़ेयुनायटेड नेशन्स ऑर्गनायङोशनच्यावतीने 21 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येतो़ यांतर्गत विविध कलाप्रकारांद्वारे जागतिक शांततेचा संदेश देण्याची पद्धत आह़े यांतर्गत जगभरात पेंटींग फॉर पीस हा उपक्रम हाती घेण्यात येतो़ शुक्रवारी यांतर्गत तळोदा येथील गो़हू़महाजन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 200 विद्याथ्र्यानी सहभागी होत विविध चित्रे काढून विश्व शांततेसाठी कल्पनेचे विविध रंग भरल़े नाशिक येथील विश्व शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र आणि भारत-युरोप मंडळ यांच्यावतीने पेंटीग फॉर पीस अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला होता़ यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्याच्या न्यू हायस्कूल या एकमेव शाळेची निवड करण्यात आली होती़ दुपारी 1 ते 3 या दरम्यान झालेल्या या उपक्रमात सहभागी होत विद्याथ्र्यानी कागदावर विविध संकल्पना रंगरेषांना धरून चितारल्या होत्या़ सहभागी झालेल्या सर्व 200 विद्याथ्र्याना युनोस्को आणि जर्मनी या देशांकडून प्रमाणपत्र देण्यात येणार असून यातील काही उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन हे संयुक्त राष्ट्र संघातर्फे जिनिव्हा येथे संयुक्त प्रदर्शन भरवण्यात येणार आह़े यातील सवरेत्कृष्ट 10 चित्रांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी देऊन गौरवण्यात येणार आह़े युनेस्कोच्या बुलेटीनमध्ये ही चित्रे छापूनही येणार आहेत़ संस्थेच्या अध्यक्षा मंगला महाजन, स्थानिक स्कूल कमेटीचे चेअरमन अरूणकुमार महाजन, प्राचार्य ए़एच़टवाळे, उपमुख्याध्यापक जी़आऱबोरसे, पर्यवेक्षक एस़जी़ माळी, एम़एस़परदेशी, सांस्कृतिक विभागप्रमुख ए़ए़महाजन, संकेत माळी यांच्यासह शिक्षक यावेळी उपस्थित होत़े चित्र काढण्यात आल्यानंतर त्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिक्षकांसह पालकांचीही गर्दी झाली होती़ विद्याथ्र्यानी शांतीसंदेशाच्या बोलक्या रेषा पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केले होत़े
बोलक्या रेषांमध्ये रंगला विश्वशांती दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 3:54 PM