शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कोरोनासंगे यंदा दशामाता उत्सव रंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा दशामाता उत्सव साजरा होत आहे. सोमवारी मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा दशामाता उत्सव साजरा होत आहे. सोमवारी मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली. दरवर्षी वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे मातेची मूर्ती नेली जात होती. यंदा मात्र त्याला फाटा देण्यात आला आहे. तरीही कुटूंबातील सदस्यांनी मूर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी केल्याचे काही ठिकाणी दिसून आले.आषाढ अमावस्येपासून अर्थात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दहा दिवस दशा माता उत्सव साजरा केला जातो. गुजरातमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गुजरातच्या सिमेवर नंदुरबार जिल्हा असल्याने जिल्ह्यात देखील हा उत्सव साजरा केला जात असतो. गेल्या काही वर्षांपासून त्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उत्सवाला मर्यादा आली आहे. घरगुती स्वरूपात हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. त्याचे पालन भाविक करतांना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मातेची मूर्ती घरोघरी नेली जात आहे. दरवर्षी मिरवणुकीने आणि डिजे व बॅण्ड लावून मूर्ती नेली जाते. यंदा या सर्वांवर बंदी असल्याने तसेच गर्दी न करण्याच्या सुचना असल्याने मिरवणुकांना फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी अनेक भागातूून कुटूंबांनी एकत्र येत बाजारातून मूर्ती नेली. मूर्ती नेतांना काहींनी गर्दी केली तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले. आता दहा दिवस उत्सव साजरा होणाऱ्या घरांमध्ये उत्साह व धार्मिक वातावरण राहणार आहे.दहाव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी देखील मिरवणूक काढता येणार नसल्याचे स्पष्ट आहे.