नंदुरबार : जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला बसला आहे. कलरवरील 28 टक्के, पीओपीवरील 18 टक्के जीएसटीमुळे आणि काथ्याच्या किमती 500 रुपयांनी वाढल्याने मूर्ती कारागिरांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरीकडे गणेश मंडळ कार्यकर्ते गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती मागत असल्यामुळे किमतीचे समायोजन करताना मोठी कसरत होत आहे.आठ दशकांपेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या येथील गणेशमूर्ती उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. चार वर्षापूर्वी थेट आखाती देशात व दक्षिण आफ्रिकेत येथील मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. यंदादेखील गुजरात, मध्य प्रदेश राज्यात मूर्ती पाठविल्या जात आहेत. 35 पेक्षा अधिक लहान-मोठय़ा कारखान्यांमधून एक इंचापासून ते 20 फुटार्पयतच्या हजारो मूर्ती येत्या गणेशोत्सवासाठी आकारास येत आहेत. परंतु यंदा जीएसटीचा फटका मूर्ती उद्योगाला बसला आहे. एकीकडे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि दुसरीकडे मूर्ती विक्रीची किंमत याचा ताळमेळ घालताना मूर्तिकारांचा गोंधळ उडत आहे.कलर व पीओपीवर जीएसटीमूर्ती तयार करण्यासाठी महत्त्वाचे घटक असलेल्या कलर व पीओपीवर अनुक्रमे 28 व 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्हींच्या किमती जबर वाढल्या आहेत. नंदुरबारातील मूर्ती कारागीर इंदूर किंवा सुरत येथून ठोक भावात कलर व पीओपी मागवत असतात. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही वस्तू जवळपास 20 ते 25 टक्के अधिक किमतीत खरेदी कराव्या लागत आहेत. मूर्ती तयार करण्याच्या घटकातीलच एक असलेल्या काथ्याची किंमतदेखील वाढली आहे. गेल्यावर्षी 30 किलोचा गठ्ठा 1150 रुपयांना मिळत होता यंदा तो 1650 रुपयांना मिळत आहे. अर्थात 500 रुपयांची वाढ त्यात झाली आहे. मूर्ती कारागिरांची मेहनत, मजुरांचा पगार, वीज बिल, जागेचे भाडे आणि इतर बाबी यांचा विचार करता मूर्तीच्या किमतीत यंदा वाढ होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील नेहमीची मंडळे मूर्ती बुक करण्यासाठी येतांना गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती बुक करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे परवडत नसतानाही कारागिरांना किमतीबाबत समायोजन करून किमती स्थिर ठेवाव्या लागत आहेत.मूर्ती कलेला घरघरयेथील मूíतकलेला विविध अडचणींमुळे घरघर लागली आहे. शहरात 30 ते 35 मूर्ती कारागीर असून त्यांच्या कारखान्यांसाठी जागा नाही. वीज बिलात सवलत नाही. कला म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहिले जात असल्यामुळे मूर्ती कलेला घरघर लागली आहे. याशिवाय परप्रांतीय मूर्तिकारदेखील शहरात येऊन मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे येथील कारागिरांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नंदुरबारात गणेशपेठसाठी जागा देऊन सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास ही कला टिकून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.घरगुती उद्योग म्हणूनही..नंदुरबारात मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांप्रमाणे मूर्ती तयार करण्याचे घरगुती उद्योगदेखील आहेत. जुन्या नंदुरबारातील घराघरांमध्ये महिला, मुले मूर्ती तयार करतात. अगदी एका इंचापासून येथे मूर्ती तयार करण्याची कला अवगत आहे. सध्या शाडूच्या मूर्त्ीना चांगली मागणी असल्यामुळे शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करणारेदेखील अनेकजण तयार झाले आहेत. काही परिवार वर्षानुवर्ष केवळ शास्त्रोक्त पद्धतीनेच मूर्ती साकारत आहेत. अर्थात शास्त्रात मूर्ती साकारण्याचे जे नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत त्यानुसारच ते मूर्ती तयार करतात. त्यात ते कोणतीही तडजोड करीत नसल्याचे दिसून येते. या व्यवसायावर देखीेल नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम दिसून येत आहे.
जीएसटीचा जबर फटका यंदा गणेशमूर्ती उद्योगाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:04 PM