शरद पाडवी ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व सुविधांचा प्रश्न उपस्थित करीत नेहमीच शहरी व ग्रामीण शिक्षणाची तुलना केली जाते. तसे ग्रामीण भागाला एरवी कमी लेखत सुविधांनाही दोष दिला जातो. खेड्यातील मुले अपयशी झाल्यास शिक्षणालाच कारणीभूत ठरविले जाते. परंतु कन्साई ता.शहादा येथील मूळ रहिवासी न्यायाधिश योगेश्वर वळवी यांची ही बाब खोटी ठरवत वयाच्या २८ व्या वर्षीच न्यायदानाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील वातावरण आवश्यकतेनुसार ध्येय निर्माण करणारे तर तेथील शिक्षणही ध्येयाकडे उडाण करण्याचे बळही देत असल्याचे न्या. वळवी यांच्या यशस्वी प्रवासाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.अमळनेर न्यायालयाच्या कनिष्ठ विभागात सिव्हील जज म्हणून कार्यरत असलेले न्यायाधिश योगेश्वर वळवी हे उच्च पदावर विराजमान झाले असले तरी त्यांची नाळ या ‘मायभू’शी जुळलेली आहे. आदिवासी समाजातील व्यथांचा त्यांना चांगली जाणिव आहे. समाजातील काही कडवट वास्तवही त्यांनी कहाटुळच्या जिल्हा परिषद शाळेत शालेयपासून १२ पर्यंतचे शिक्षण घेतांनाच ओळखले होते, म्हणूनच त्यांच्यात समाजाबद्दल कळवळा दिसून येतो. त्यांच्या जीवनाला भव्य तथा शहरी शिक्षणाचा वलय होते असेही नाही. ग्रामीण भागातच शिक्षण घेतले असले तरी समाजाच्या व्यथांमधून त्यांना न्यायाप्रक्रियेत भवितव्य घडविण्यासाठी ते प्ररित झाले होते. इंग्रजी वाड्मयातून पदवी पूर्ण करुनही त्यांनी न्यायाधिश पदाचे सर्वोच्च ध्येय ठेवले. पदवीनंतर त्यांनी भवितव्याला अंशत: वळण देत थेट एलएलबीला प्रवेश घेतला. एलएलबीत न्यायप्रक्रियेचे धडे घेत असताना ते काही यशस्वी वकिल व न्यायाधिशांच्याही संपर्कात आले. त्यातूनच त्यांना खऱ्या अर्थाने न्यायदानाची प्रेरणा मिळाली. परिणामी त्यांच्या न्यायाधिश पदापर्यंतच्या प्रवासातील बहुतांश अडथळे देखील दूर झाले. ते उपेक्षित, अन्यायग्रस्त व पीडितांना न्यायदान करीत आहे.४सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या कन्साई ता.शहादा हे गाव काही अंशी विकासाला पारखे ठरत असून ते गाव न्यायाधिश योगेश्वर वळवी यांना संस्कार घडविणारे आहे. शिवाय उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणाऱ्यांच्या पंखांना बळ देणारे देखील ठरते.उदरनिर्वाह तथा कामानिमित्त न्या. वळवी यांच्या परिवाराने कहाटुळ येथे वास्तव्यास आले. कहाटुळ हे गाव काही यशस्वीतांचे असले तरी त्यांची संख्या किरकोळच आहे. यापेक्षा विकास तथा सुविधांच्या दृष्टीने हे गाव देखील उपेक्षित राहिल्याचे म्हटले जाते. असे असतानाही तेथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत न्यायाधिश वळवी यांनी ध्येयाकडे वाटचाल करण्यास हातभार लागत आहे.न्या. वळवी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी भव्यतम नसली तरी संस्कारशिल होती. त्यांच्या परिवारातील ज्येष्ठांच्या चर्चेत न्यायाच्या बाबी कोणत्या अन् अन्यायाच्या कोणत्या? याचे धडे कुटुंबातूनच मिळाले. बालपणीच आदिवासी समाजाच्या असह्य समस्या देखील न्या.वळवी यांच्या न्याय - अन्यायाचा दृष्टीकोन वाढीसाठी कारणीभूत ठरल्या.न्यायाधिश पदांवर आदिवासी समाजातील मोजकेच व्यक्ती कार्यरत आहे. या समाजातील युवकांनी अन्य क्षेत्रापाठोपाठ या क्षेत्राकडे वळणे काळाची गरज असल्याने आव्हाने पेलत युवकांनी यात उडी घेतली पाहिजे. हे आवाहन स्वकारतांना आधुनिकतेचा अवलंब देखील आजच्या युवकांनी करावा, असा आग्रह न्या.वळवी हे नेहमीच करीत आले आहे.उज्ज्वल भवितव्याला आकार देण्याचा प्रयत्न करणाºया व आरक्षणप्राप्त युवकांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षणाचा लाभ दिला जातो. परंतु न्यायाधिशपदासाठी होणाºया भरतीत कुठलेही आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे हे क्षेत्र बहुतांश युवकांसाठी आव्हानाचे ठरते, असे असतानाही न्या. वळवी यांनी २०१६ मधील स्पर्धा परिक्षेत आरक्षणाचा विचार न करता मोठ्या धाडसाने सहभाग घेतला. त्यावेळी २२४ जागांसाठी भरती करण्यात आली. ध्येयाकडे धाव घेणारे न्या. वळवी हे १८२व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
दुर्गम भागातील योगेश्वरची न्यायदानात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:05 PM