लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचा:यांना अनेक ग्रामपंचायतींनी मानधन न दिल्याने अशा कर्मचा:यांनी सोमवारी पंचायत समितीसमोर उपोषण केले. यासंदर्भात गटविकास अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर विविध कामे आणि दाखले देण्यासाठी सरकारने आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केले आहेत. अशा ठिकाणी मानधन तत्वावर कर्मचारी नेमले आहेत. परंतु या कर्मचा:यांना काही ग्रामपंचायतींनी अनेक महिन्यांपासून मानधनच दिले नसल्याचा आरोप आहे. याबाबत कोरीट ग्रामपंचायतीच्या कर्मचारी स्नेहल कांतिलाल पटेल यांनी आवाज उठवत या प्रश्नाला वाचा फोडली. या माध्यमातून तालुक्यातील 40 पेक्षा अधीक ग्रामपंचायतींनी कर्मचा:यांचे मानधन थकविल्याचे स्पष्ट झाले आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करून आणि ते देखील वेळेवर मिळत नसल्यामुळे असे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. याची चौकशी करून संबधीत अधिका:यांवर कारवाई करावी आणि मानधन मिळावे यासाठी स्नेहल पटेल यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून मानधन थकलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचा:यांनीही सहभाग घेतला. याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.
आपले सरकार केंद्रातील कर्मचारी उपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:08 PM