लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील कोरीट नाका भागात मागील भांडणाच्या वादातून युवकावर फायटरने हल्ला करुन जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. याप्रकरणी जखमीवर उपचार पूर्ण केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. मोहम्मद समीर मोहम्मद आरीफ रा. कुरेशी मोहल्ला असे जखमी युवकाचे नाव आहे. मोहम्मद समीर हा मंगळवारी रात्री कोरीट नाक्यावर उभा असताना त्याठिकाणी हुसेनन शेख नबा ऊर्फ दिन्या रा. कुरेशी मोहल्ला हा आला. दोघांमध्ये मागील भांडणावरुन वाद झाला. याचा राग येवून हुसेनन शेख याने त्याच्याजवळील फायटर काढून समीर याच्या डाव्या डोळ्यावर मारून दुखापत केली. घटनेनंतर जखमीला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याबाबत मोहम्मद समीर याने शुक्रवारी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित हुसेनन याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील भांडणाच्या वादातून नंदुरबारात युवकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:48 AM