लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी भेट देऊन बॅरेज प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत विभागाचीदेखील माहिती जाणून घेत अधिका:यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळसदृश्य स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करावे यासाठी ही भेट दिल्याचे सांगण्यात आले.याबाबत वृत्त असे की, चिपळूण तालुक्यात झालेल्या धरण फुटीनंतर प्रकाशा बॅरेजच्या पाहणीसाठी अधिका:यांच्या भेटी वाढल्या आहेत. धुळे येथील कार्यकारी अभियंता एस.जी. शहापुरे यांनी प्रकाशा बॅरेजला भेटी देऊन वरिष्ठांना सूचना दिल्यात. यानंतर जळगावचे अधीक्षक अभियंता एस.जी. वंजारी यांनी पाहणी करून सर्व अधिका:यांना धारेवर धरत मुख्यालयी राहण्याच्या सूचनाही दिल्या. दरम्यान, शुक्रवारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी बॅरेजला भेट देत पाहणी केली. याप्रसंगी गटविकास अधिकारी टी.टी. गोसावी, बालविकास प्रकल्प अधिकारी रणजित कुरे, बॅरेजचे सहाय्यक अभियंता वरूण जाधव, पियुष पाटील, जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, अरुण वरसाळे, दिलीप पाटील, नंदकिशोर पटेल, गजानन भोई, रामबाबा पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी गावाची पाहणी करीत मुख्य कार्यकारी अधिका:यांनी बॅरेजची पाहणी केली. पाण्याची लेव्हल काय आहे ते जाणून घेतले. यानंतर त्यांनी एका गेटजवळ उभे राहून गेट ऑपरेट करण्यास सांगितले. गेट वर घेण्यापूर्वी हॉर्न वाजवला जातो का याची खात्री केली. त्याचप्रमाणे गेट खाली-वर करताना काही अडचणी आहेत का हे ही प्रत्यक्ष पाहिले. बॅरेजवर स्थापत्य विभागाचे वरूण जाधव, सुनील भिल यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हते. या वेळी यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे अधिकारी नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅरेजचे गेट वर-खाली करताना अडचण येऊ नये यासाठी लवकरच ग्रीसिंग व ऑईलिंगचे काम करण्याच्या सूचना देत पावसाळा सुरू असेर्पयत गेट वर करून कामाला लागावे. हे करताना शेतक:यांनाही विश्वासात घेऊन काम करावे आणि पावसाळा संपण्याच्या अगोदर गेट डाऊन करून पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, असे सांगितले. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, हातचे पाणी वाया जावू नये यासाठी अधिका:यांनी दक्ष राहून योग्य ते नियोजन करावे, असे सांगितले. या बॅरेजलगतच केदारेश्वर मंदिर असून मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्यासह मंदिराचे सदस्यांनी बॅरेज परिसरात वृक्ष लागवड केली.
जि.प. सीईओंची प्रकाशा बॅरेजला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:19 PM