नंदुरबार : येत काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व सेनेनेही चांगलीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. थेट सरपंचपदाची देखील निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त गावांवर आपले वर्चस्व असावे यासाठी प्रय} झाले. स्थानिक प्रश्न आणि राजकारणावरच ही निवडणूक लढविली गेली. असे असले तरी काँग्रेस व भाजपने दावे-प्रतिदावे केले आहेत. जिल्ह्यातील 66 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल गुरुवारी लागला. अनेक ठिकाणी निकालाचे गणित चुकले तर काही ठिकाणी अपेक्षीत निकाल लागले. थेट सरपंच पदासाठी निवडणूक असल्यामुळे सर्वच ठिकाणी चुरस देखील दिसून आली. असे असले तरी माघारीच्या वेळीच जवळपास 12 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. उवर्ररित 53 ग्रामपंचायतींसाठी बुधवारी चुरशीची निवडणूक झाली.जि.प. निवडणुकीची पाश्र्वभुमीया निवडणुकांना येत्या काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर झालेल्या या 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बरेच काही सांगून गेले आहेत. जास्तीत जास्त गावे आपल्या ताब्यात असावे, आपले उमेदवार सरपंचपदी असावे यासाठी काँग्रेस, भाजपने आटापीटा चालविला होता. वरिष्ठ पातळीवरून देखील याकडे पाहिले गेले होते. कारण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चुरस राहणार असल्याने नेत्यांनीही ही निवडणूक गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे निकाल लागताच दावे केले.प्रतिष्ठा पणालाथेट सरपंच पदाची निवडणूक असल्यामुळे अनेक स्थानिक नेते, पदाधिका:यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गाव पातळीवर नाते-गोते, संबध आणि गावगाडा लक्षात घ्यावा लागतो. शिवाय एकाएका मताचे महत्त्व असते. ही बाब लक्षात घेता स्थानिक नेत्यांनी राजकीय दबाव तंत्राचा देखील काही ठिकाणी वापर केला. त्या माध्यमातून आपल्या गटातील, पक्षातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी भावनिक आणि राजकीय डावपेचातून देखील आवाहन करण्यात आले होते.जल्लोष आणि उत्साहतहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. जसे निकाल बाहेर येत होते त्याप्रमाणे त्या त्या गावातील कार्यकर्ते मंडळी गुलाल उधळून जल्लोष करीत होती. गावागावात देखील जल्लोष करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. पोलिसांनी संवेदनशील गावांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे निकालानंतर सायंकाळी उशीरार्पयत कुठेही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गंभीर प्रसंग उद्भवला नाही.
जि.प.निवडणुकीची सेमी फायनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:59 AM