सारंगखेडा यात्रेच्या नियोजनासाठी जि.प. प्रशासनाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:54 AM
सारंगखेडा यात्रा : मुख्य कार्यकारी अधिका:यांकडून पशुसंवर्धन, आरोग्य विभागाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या यात्रेला 3 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाच्या आढावा बैठका सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दत्त मंदिर सभागृहात संबंधित अधिका:यांची आढावा बैठक घेतली. संबंधितांना सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना बैठकीत बिनवडे यांनी दिल्या.या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी मंदिर परिसर, घोडा बाजार प्रांगण, मुख्य बाजारपेठ, सूर्यकन्या रिसोर्ट व अश्व संग्रहालयाच्या जागेची पाहणी केली. बैठकीत ते म्हणाले की, यात्रा काळात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी यासह इतर संबंधित विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. आरोग्य विभागाकडून यात्रेकरुंसाठी केलेल्या उपाययोजना, औषधसाठा, कर्मचारी नियोजन याबद्दल माहिती त्यांनी जाणून घेतली. ग्रामपंचायत विभागाकडून स्वच्छता, पाणी, वीज आदींची माहिती तर पशुसंवर्धन विभागाकडून औषधासाठा व कर्मचा:यांचा आढावा घेत संबंधित विभाग प्रमुखांनी सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे सांगितले.प्रास्ताविकात चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल म्हणाले की, यात्रेला 350 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असून ही यात्रा जागतिक स्तरावर कशी नेता येईल यासाठी चेतक फेस्टीवलमार्फत विविध कार्यक्रम घेऊन प्रयत्न सुरू आहेत. येथे अश्व संग्रहालय मंजूर असून त्याचा भूमिपूजन समारंभ यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अश्वांसाठी अत्याधुनिक दवाखाना उभारणार असून भाविक व पर्यटकांसाठी सोयी-सुविधा व घोडय़ांच्या विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीला गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, पाणीपुरवठा विभागाचे जी.जे. मराठे, रणजित कु:हे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ.योगेश देशमुख, डॉ.सागर परदेशी, तेजस्विनी समितीच्या सदस्या अनामिका चौधरी, चेतक फेस्टीवल समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुजाता पाटील यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी आर.आर. बोरसे यांनी मानले.