नाशिक : सोमवारी (दि.२१) होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोकांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील ३३१ गुंडांचा समावेश आहे. या व्यक्तींचा मतदानाचा हक्क मात्र प्रशासनाने अबाधित ठेवला आहे.विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहर व परिसरात सर्वत्र शांततेत पार पाडण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. अतिरिक्त वाढीव पोलीस बंदोबस्तासह निमलष्करी दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. गुन्हेगारांचा पूर्वइतिहास लक्षात घेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुंडांना थेट जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.आदर्श आचारसंहितेच्या महिनाभराच्या कालावधीत एकूण ५५ गुंडांना शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार केले आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३३१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शनिवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर जाण्याचे आदेश काढले गेले आहे.दरम्यान या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचेही मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे; मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुन्हा त्यास मंगळवार सकाळपर्यंत शहराबाहेर रहावयाचे आहे. शिवाय मतमोजणीच्या दिवशी गुरुवारीही (दि.२४) शहर सोडणे बंधनकारक असल्याची माहिती उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. सातपूरमधील संघटितपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या कल्पेश दीपक वाघ याच्यासह त्याच्या साथीदारांनाही शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.त्याचबरोबर ९ गुन्हेगारांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. या संबंधितांना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.
३३१ गुंडांना शहरात बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:40 PM
सोमवारी (दि.२१) होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोकांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील ३३१ गुंडांचा समावेश आहे. या व्यक्तींचा मतदानाचा हक्क मात्र प्रशासनाने अबाधित ठेवला आहे.
ठळक मुद्देमनाई हुकूम : ‘समज जाओ, सुधर जाओ’चा अप्रत्यक्ष संदेश