लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (दि. ३) दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रांवर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली.विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी दहावीची परीक्षा अवघ्या अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शिक्षण मंडळाची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तणावमुक्त परीक्षेसाठी राज्य मंडळाने नियुक्त केलेल्या दहा समुपदेशकांशिवाय विभागीय मंडळाने स्वतंत्ररीत्या अतिरिक्त चार समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व समुपदेशक विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा तणाव व दडपण कमी करण्यासाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे. कॉपीमुक्तीसाठी बैठकबारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरदरम्यान जळगावातील भडगाव येथील परीक्षा कें द्रावर उत्तरपत्रिका तयार करून छायांकित प्रती तयार करण्यासारखा गंभीर प्रकार समोर आला होता. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेत विभागातून जळगावमध्येच सर्वाधिक गैरप्रकार समोर आले होते. त्यामुळे विभागीय मंडळाने जळगाव जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने रविवारी (दि.१) जळगावी सर्व केंद्र संचालकांची बैठक बोलावली असून, विभागीय मंडळाचे सचिव नितीन उपासनी हे सर्व केंद्र संचालकांना मार्गदर्शन करणार आहेत.जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा केंद्र विद्यार्थी परीरक्षकनाशिक २०२ ९७,९३४ २६धुळे ६३ ३१,८३७ ०८नंदुरबार ४६ २२,६०३ ०७जळगाव १३४ ६४०७० १८एकूण ४४५ २,१६,४४४ ५९
२ लाख १६ हजार परीक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:11 PM
नाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारपासून (दि. ३) दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रांवर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली.
ठळक मुद्देनाशिक विभाग : दहावीची ४४५ कें द्रे, २०२ केंद्रांवर ९८ हजार प्रविष्ट