वणी : दिंडोरी वणी रस्त्यावरील लखमापुर फाटा परिसरात बेकायदा दारू विक्र ीसाठी घेऊन जातानाचे वाहन विशेष पोलीस पथकाने पकडले असुन १ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचे देशी विदेशी मद्य व ५ लाख रु पयांचे वाहन असा एकुण ६ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एका संशयीताला अटक करण्यात आली आहे.विशेष पोलीस पथकाने अवैध व्यावसायीकांविरोधातील पंधरवड्यात तीसरी कारवाई आहे. पोलीसांना मिळालेल्या माहितीन्वये कारवाई सुरु केली आहे. दिंडोरी, वणी रस्त्यावरून (एमएच १५ इजी ४५२३) जीपमधुन देशी विदेशी मद्याची वाहतुक विक्र ीसाठी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक आरती सिंह यांना मिळाली. त्या माहितीनुसार लखमापुर फाटा परिसरातील श्री हरि ?ग्रो वजनकाटा भागात विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरिक्षक डी. बी. मोहिते, संकेत कासार, सचिन जाधव, रविन्द्र गवळी, बस्तीराम सदगीर व सहकारी यांनी या ठिकाणी सापळा लावला. तेव्हा सदरचे संशयास्पद वाहन दिडोरी बाजुकडुन येताना दिसले ते वाहन पथकाने अडविले व तपासणी केली तेव्हा त्यात १ लाख ४९ हजार ७६० रु पयांची देशी दारू प्रिंस संत्रा व विदेशी मद्य तसेच बियरच्या बाटल्या असा ४२ हजार १९२ रु पयांचा असा एकुण १ लाख ९१ हजाराचा मद्यसाठा व ५ लाख रु पयांचे वाहन असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.या प्रकरणी कचरू बबन सानवणे (शिवाजीनगर, दिंडोरी) याला विनापरवाना बेकायदा वाहतुक चोरट्यामार्गाने माल विक्र ी करण्याचा उद्देश विनापरवाना स्वत:च्या कबजात बेकायदा मध्यसाठा बाळगणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात सदरचे मद्य कोणाकडून खरेदी केले व कोणाला विक्र ी करावयाची याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.दरम्यानसुन वरखेडा येथे अवैध मटक्याच्या अड्यावर धाड टशकून ७६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला, तर खेडगावला २५ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याने तर आता ६ लाख ९१ हजाराचा मध्यसाठा वाहनासाहित जप्त अशा कारवाईची मालिका विशेष पोलीस पथकाने लावल्याने कारवाईच्या भितीने ते घटक अस्वस्थ झाले आहेत.
धाडसत्रात १ लाख ९१ हजाराचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:15 AM
वणी : दिंडोरी वणी रस्त्यावरील लखमापुर फाटा परिसरात बेकायदा दारू विक्र ीसाठी घेऊन जातानाचे वाहन विशेष पोलीस पथकाने पकडले असुन १ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचे देशी विदेशी मद्य व ५ लाख रु पयांचे वाहन असा एकुण ६ लाख ९१ हजार ९५२ रु पयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एका संशयीताला अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे५ लाख रु पयांचे वाहन असा मुद्देमाल ताब्यात