नाशिक : अवघ्या दहा रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळी उपक्रमास येत्या २६ पासून जिल्ह्णात सुरुवात होत असून, त्यासाठी जिल्ह्णाला ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विभागात नाशिक जिल्ह्णाला मिळालेले हे सर्वाधिक अनुदान आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या शिवभोजन थाळी योजनेला प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात होत आहे. सर्वसामान्यांना अवघ्या दहा रुपयांत थाळी मिळणार असली तरी प्रत्येक थाळीमागे ४० रुपये खर्च होणार आहे. यासाठी जिल्ह्णाला मंजूर थाळीसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिकरोड रेल्वेस्टेशन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांसह मालेगाव तालुक्यात एकाच ठिकाणी शिवभोजन थाळी मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून या योजनेसाठी नाशिक विभागाला १ कोटी ८ लाख अनुदान प्राप्त झाले आहे.शिवभोजन थाळीचा खर्च हा प्रतिप्लेट ५० रु पये इतका आहे. ही थाळी पुरविणाºयास शासनाकडून प्रतिथाळीमागे ४० रु पये सबसिडी दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातही पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी ही थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध दिली जाणार आहे. प्रत्येककेंद्राला दिवसाला दीडशे थाळींची मर्यादा देण्यात आली आहे. दररोज नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणी, तसेच जिल्हाभरातील अनेक भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांना यायोजनेचा अधिक लाभ होणार आहे. तसेच बाजार समिती आणि रेल्वेस्थानक या गर्दीच्या ठिकाणी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.विभागात मिळणार अनुदानशिवभोजन थाळीसाठी नाशिक जिल्ह्णाला ३६ लाख, धुळे जिल्ह्णाला १० लाख ८० हजार, नंदुरबार जिल्ह्णाला १० लाख ८० हजार, जळगाव जिल्ह्णाला २५ लाख २० हजार, नगर जिल्ह्णाला २५ लाख २० या प्रमाणात अनुदान प्रदान करण्यात आले आहे.
शिवभोजन थाळीसाठी जिल्ह्याला ३६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:10 AM
अवघ्या दहा रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळी उपक्रमास येत्या २६ पासून जिल्ह्णात सुरुवात होत असून, त्यासाठी जिल्ह्णाला ३६ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विभागात नाशिक जिल्ह्णाला मिळालेले हे सर्वाधिक अनुदान आहे.
ठळक मुद्देरविवारी शुभारंभ : थाळीमागे येणार चाळीस रुपयांचा खर्च