शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:43 AM

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.

ठळक मुद्दे१पोलिसांच्या जाचक त्रासाविरोधात मोर्चा कृती समिती : अराजकता माजण्याचा इशारा

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांकडून नाशकातील सर्वसामान्य नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांना विविध प्रकारच्या अत्याचाराला बळी पडावे लागत असल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा-टॅक्सी कृती समितीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांची दंडुकेशाही अशीच सुरू राहिली तर शहरात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोर्चेकºयांनी दिला आहे.यासंदर्भात सकाळी शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौक, शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मध्यवर्ती बसस्थानक चौकातून मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.त्यात म्हटले आहे की, शहरात वाहन तपासणीच्या नावाखाली रस्त्याच्या मध्यभागीच खाकी पोलीस तसेच वाहतूक पोलीस आडवे येत आहेत. कागदपत्र तपासणीसाठी मानसिक व आर्थिक छळ करीत आहेत. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, सक्तीने दंडाची वसुली असे प्रकार घडत आहेत.पोलीस निरीक्षक काळे, कदम, हवालदार परदेशी हे अधिकारी प्रामुख्याने नागरिकांना त्रास देत असून, टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे सारे प्रकार करावे लागत असल्याचे नागरिकांना सांगत आहेत. या मोर्चात शिवसेनेचे शिवाजी भोर, रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, मनसेचे भय्या मनियार, भाजपाचे भगवंत पाठक, हैदर सय्यद यांच्यासह सखाराम गोपाळ, मुरली घोरपडे, मामा राजवाडे, नितीन पवार यांच्यासह शेकडो वाहनचालक सहभागी झाले होते. पोलीसांची दडपशाही न्यायालयाची दिशाभूल करून रिक्षा व टॅक्सी चालकांवर खोट्या केसेस केल्या जात आहेत. जाब विचारणाºया राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.२ पोलिसांची अशीच दडपशाही सुरू राहिल्यास अराजकता माजण्यास वेळ लागणार नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शहरात रिक्षा, टॅक्सी थांब्याचे फलक लावावेत, वाहन पार्किंग, नो पार्किंग झोनचे फलक लावावे, थांब्यांचे तत्काळ सर्वेक्षण करावे, शहरातील ६८६ रिक्षा आरटीओने अडकून ठेवल्या आहेत, त्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.