शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

३३३ नवसैनिक भारतीय तोफखान्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 3:57 PM

४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले.

ठळक मुद्दे३३३ जवानांची (गनर) तुकडी ‘उमराव’ मैदानातून... सैनिक धर्म व सैनिकी शिस्त आयुष्यात विसरता कामा नये

नाशिक : ‘मैं दृढ प्रतिज्ञा करता हूं की, कानून द्वारा निश्चित किये गये भारतीय संविधान का सच्चे मन से वफादार रहुंगा...’ अशी तोफांच्या साक्षीने शपथ घेत ३३३ जवानांची (गनर) तुकडी ‘उमराव’ मैदानातून भारतीय तोफखान्यात दाखल झाली. यावेळी जवानांनी केलेले सशस्त्र संचलन डोळ्यांची पारणे फेडणारे होते.निमित्त होते, नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या शपथविधी सोहळ्याचे. शनिवारी (दि.८) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले. यावेळी तोफखान्याच्या बॅन्ड पथकाने वाजविलेली विविध देशभक्तीपर धूनने जवानांचा उत्साह वाढविला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून विशिष्ट सेवा पदक विजेते स्कूल आॅफ आर्टिलरीच्या गनरी शाखेचे मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल पी.रमेश उपस्थित होते. त्यांना तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर जे. एस. गोराया यांनी उमराव कवायत मैदानाच्या सलामीमंचावर लष्करी थाटात आणले. यानंतर धीमण यांनी शपथविधी सोहळ्याचे समीक्षण करत मैदानाची जिप्सीमधून पाहणी केली.या सोहळ्याप्रसंगी पी. रमेश म्हणाले, आपल्या पूर्ण कारकिर्दीत आजचा दिवस सदैव स्मरणात ठेवा. तोफखाना केंद्राचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुमची जात केवळ सैनिक आणि धर्म केवळ देशाचे रक्षण हाच आहे. आपल्या अंगावरील वर्दीचे महत्त्व लक्षात घेत तीचा सन्मान करत तुम्ही ‘तोपची’ म्हणून भारतीय सेनेत अभिमानास्पद कामगिरी करावी आणि आपल्या तोफखाना केंद्राचा नावलौकिक वाढवावा. मला विश्वास आहे, भविष्यात या तुकडीचे सर्व सैनिक आपली जबाबदारी चोखपणे बजावतील. सैनिक धर्म व सैनिकी शिस्त आयुष्यात कधीही कोठेही विसरता कामा नये, असा गुरूमंत्रही यावेळी दिला.

या प्रशिक्षणार्थींचा झाला गौरवपरेड कमांडर अमोल वानखेडे (बेस्ट इन ड्रील), प्रतीक के. एस (अष्टपैलू), अजीत कुमार(उत्कृष्ट तंत्रज्ञ), दीपक यादव (तंत्रज्ञ), हरिकेश (रेडियो आॅपरेटर), रिषभ दुबे (उत्कृष्ट गनर), श्रीजीत ए.एस (वाहनचालक), चिन्मया प्रधान (उत्कृष्ठ शेफ) यांना लक्षवेधी कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले.
माता-पित्यांना गौरव पदकपरेडच्या समारोपानंतर आवारातील हिरवळीवर ३३३ नवसैनिकांच्या माता-पित्यांना तोफखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या सन्मानाने ‘गौरव पदक’ प्रदान केले. ‘मेरी संतान देश को समर्पित’ असे वाक्य या पदकावर होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक