नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (दि.२९) नव्याने १ हजार २७४ नवे रुग्ण आढळून आले. १७ रुग्णांचा दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.सर्वाधिक ९५८ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले असून, शहरात उपचारार्थ दाखल १३ रुग्ण दगावले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी मृतांचा आकडा पुन्हा वाढला. जिल्ह्यात दिवसभरात ६४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.मागील पाच दिवसांपूर्वी कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार २३० संशीयत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे.. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत २७ हजार ९७८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच ६ हजार ४८६ रु ग्ण उपचार घेत आहेत. ९० हजार ९७ संशयितांचे नमुना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.येवल्यातील सहा अहवाल पॉझिटिव्ह येवला शहरासह तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल शनिवारी (दि.२९) पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३४८ झाली असून आजपर्यंत २६१ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.नायगाव शिवारात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी व जोगलटेंभी आदी गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढू लागले आहे.
जिल्ह्यात १ हजार २७४ कोरोनाचे नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:33 AM
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. शनिवारी (दि.२९) नव्याने १ हजार २७४ नवे रुग्ण आढळून आले. १७ रुग्णांचा दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ठळक मुद्दे दिवसभरात १७ बळी : ६४१ रुग्णांनी केला कोरोनाचा पराभव