नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) एकूण ७१ रुग्ण बाधित, तर ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक आल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत अल्पशी घट आली आहे. जिल्ह्यात एकूण उपचाराखालील रुग्णांची संख्या ३६१वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या काहीशी कमी होऊन बरोबर १००० झाली आहे. त्यात प्रामुख्याने नाशिक ग्रामीणचे ९४२, नाशिक मनपाचे ५८ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९८.०६ टक्के असून, पॉझिटिव्हिटी दर २.४७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
प्रलंबित अहवाल १ हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 1:54 AM