लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरासह तालुक्यातील १० बाधित बुधवारी कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर शहरातील आंबीया शाह कॉलनीतील एकाच कुटुंबातील ६ अहवाल रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये पॉझीटीव्ह आले आहेत.बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून ५ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधून ५ असे शहरासह तालुक्यातील एकूण १० बाधित बुधवारी (दि.२९) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २५४ झाली असून यापैकी आजपर्यंत २१५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.आत्तापर्यंत १७ जणांचा कोरोनाने बळी गेला असून बाधित अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २२ असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधित २३ रूग्णांपैकी नाशिक येथील रूग्णालयात ८, बाभुळगाव येथील विलगीकरण कक्षात १३ तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १ रूग्णांवर औषधोपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले.
येवल्यातील १० बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 8:19 PM
येवला : शहरासह तालुक्यातील १० बाधित बुधवारी कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर शहरातील आंबीया शाह कॉलनीतील एकाच कुटुंबातील ६ अहवाल रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये पॉझीटीव्ह आले आहेत.
ठळक मुद्देएकाच कुटुंबातील ६ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह