सटाणा : यंदाच्या अर्थसंकल्पात बागलाण तालुक्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. बागलाण तालुक्याचा चौफेर विकास साधण्यासाठी आधी रस्त्यांचे जाळे भक्कम करण्याच्या दृष्टीने विविध रस्ताकामे प्रस्तावित करण्यात आली होती. या चालू अर्थसंकल्पात पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी दोधेश्वरकडे विशेष लक्ष केंद्रित करून सटाणा-दोधेश्वर ङ्क्तकोळीपाडा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी पाच कोटी रु पयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मुल्हेर किल्ला व उद्धव महाराज मंदिर या तीर्थक्षेत्र, पर्यटन विकासासाठी मुल्हेर-मुंगसे-केरसाणे रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामासाठी दीड कोटी रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. म्हणून वाहतुकीची वर्दळ पाहता आणि भविष्यातील बायपासचा विचार करून ताहाराबाद येथील काठगड जवळील मोसम नदीवर समांतर पुलासाठी साडे तीन कोटी रु पयांच्या निधीला मान्यता दिली असल्याचे नमूद करून या कामाच्या लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्येक्ष कामांना सुरु वात करण्यात येणार असल्याचे डॉ.भामरे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
बागलाणच्या रस्ता विकासासाठी दहा कोटी
By admin | Published: March 24, 2017 11:21 PM