नाशिक : गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्यात आली़ या योजनेला दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद लाभला असून, तालुक्यातील १०२६ गावांनी यंदा ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबविली आहे. विशेष म्हणजे ही योजना राबविणाºया गांवामध्ये यंदा ३०२ ने वाढ झाली आहे़गणेशोत्सव काळात शांततेला बाधा पोहचू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे तंटामुक्ती समितीचे सहाय्याने ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गावागावांमध्ये शांतता स्थापित होऊन जातीय सलोखा निर्माण होण्यास चांगलीच मदत झाली आहे. तसेच या गणेशोत्सवात डीजेमुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच मोठ्या आवाजामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना त्रास होऊ नये यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, पथनाट्ये, प्रचार फेºया आयोजित करून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ या योजनेंतर्गत उत्कृष्ट देखावे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम व जातीय सलोखा ठेवून नियमांचे पालन करणाºया गणेश मंडळांना पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.
१०२६ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 12:08 AM