शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी १०० कोटींची गरज

By admin | Published: November 13, 2016 12:49 AM

वारकरी संप्रदाय : कुंभमेळ्यात मंदिर परिसर दुर्लक्षित राहिल्याचा आरोप

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केंद्र शासनाच्या तीर्थविकास योजनेअंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करून संपूर्ण मंदिराची काळ्यापाषाणात उभारणी करण्याबरोबरच येथे संतपीठ मंजूर व्हावे, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू व आद्यसद्गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांनी १६ जून १२९७मध्ये त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. या ठिकाणी त्यांचे पुरातन मंदिर आहे. साधारणत: तेराव्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरास सुमारे ७०० वर्षं पूर्ण झाली आहेत. पंढरपूरप्रमाणेच दरवर्षी पौष वारीला ३०० ते ४०० दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे ४ ते ५ लाख वारकरी श्री निवृत्तिनाथांच्या चरणी लीन होतात तर उटीच्या वारीला एक ते दीड लाख वारकरी येथे हजेरी लावत असतात. वारकऱ्यांबरोबरच राज्यभरातून लाखो भाविक संत निवृत्तिनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था ठेवताना संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानला तारेवरची कसरत करावी लागते. निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात भक्त निवास, संत निवास, वारकरी शिक्षण संस्था, ग्रंथालय, प्रसादालय, गोशाळा आणि मोफत रुग्ण सेवा आदि उपक्रमांसाठी संत मुक्ताबाई संस्थानप्रमाणे निवृत्तिनाथ संस्थानसाठी तीर्थविकास योजन ेअंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)