शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

एकाच दिवसात १०० कोटींचे ‘घबाड’

By admin | Published: November 12, 2016 12:20 AM

जिल्हा बॅँकेला आले अच्छे दिन

नाशिक : चलनातून ५०० आणि १००० हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी फायद्याचा ठरला असून, गुरुवारी सभासदांनी एकाच दिवसात ७९ कोटी बचत खात्यात, तर १२ कोटी पीक कर्ज खात्यात भरल्याची माहिती सूत्रांनी दिली.याबाबत गुरुवारीच (दि. १०) ‘लोकमत’ने यासंदर्भात ‘जिल्हा बॅँकेला येणार अच्छे दिन’ मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. बरोबर त्यानुसारच जिल्हा बॅँकेच्या पीक कर्जाची थकलेली वसुली आपोआप जमा होण्यास सुरुवात झाली असून, जिल्हा बॅँकेच्या गंगाजळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मागील वर्षी वाटप केलेल्या एकूण पीक कर्जापैकी सुमारे ९०० कोटींची पीक कर्ज थकबाकी सभासद शेतकऱ्यांकडे बाकी आहे. त्यातच यंदाच्या चालू वर्षात सुमारे १७५० कोटींचे पीक कर्ज बॅँकेने वाटप केले आहे; मात्र मागील वर्षीच्या सक्तीच्या वसुलीला राज्य सरकारने चाप लावल्याने जिल्हा बॅँकेचे कोट्यवधी रुपयांचे वाटप केलेले कर्ज थकीत झाले होते. त्यातच मध्यंतरी सहकार खात्याने जिल्हा बॅँकेला पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी सक्ती केली. त्यानंतर जिल्हा बॅँकेने सुमारे ३८ ते ४० कोटींचे पीक कर्जाचे पुनर्गठण केले; मात्र सरकारकडून आणि राज्य शिखर बॅँकेकडून अनुदान येत नसल्याने पीक कर्ज वाटपासाठी निधी शिल्लक नव्हता. गुरुवारी एकाच दिवसात बचतखात्यात ७९ कोटी तर पीक कर्ज खात्यात १२ कोटी तसेच अन्य किरकोळ जमा धरून जिल्हा बॅँकेत ९२ कोटी जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभासद शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पॅनकार्डची सक्ती नसल्याने त्यांच्याकडील लाखो रुपयांची रक्कम एकरकमी जिल्हा बॅँकेच्या शाखांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत कधीही भरता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आणखी कोट्यवधींची कर्जवसुली आणि बचतखात्यात निधी जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)