ठळक मुद्देसेमी माध्यमचा निकालही १०० टक्के
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित जनता विद्यालयाचा दहावीचा तसेच सेमी माध्यमचा निकालही १०० टक्के लागला आहे.विद्यालयाचे तीन विद्यार्थी तालुक्यात रोशनी राजू मैले (९९.८०) प्रथम, प्रणोती समाधान पवार (९९.६०.५) द्वितीय व कावेरी अरुण जाधव (९९.२०), आशिष समाधान मढवई (९९.२०) तृतीय आले आहेत.विद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब मामुडे व पर्यवेक्षक मच्छिंद्र सोनवणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.