शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विधान परिषदेसाठी १०० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:39 AM

नाशिक : गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात शांततेत ९९ टक्केमतदान झाले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विविध चर्चा, तर्क व अंदाज या निवडणुकीविषयी झडत असताना प्रत्यक्ष मतदानाच्या अवघ्या काही तास अगोदर भारतीय जनता पक्षाने राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना आपला पाठिंबा जाहीर करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या असून, मतपेटीत भवितव्य बंद झालेल्या नरेंद्र दराडे, शिवाजी सहाणे व परवेज कोकणी या तिघा उमेदवारांचा फैसला गुरुवारी होणार आहे.

ठळक मुद्देगुरुवारी निकाल : अखेरच्या क्षणी भाजपाची राष्ट्रवादीशी हातमिळवणीशिवसेनेला जोरदार धक्का

नाशिक : गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात शांततेत ९९ टक्केमतदान झाले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विविध चर्चा, तर्क व अंदाज या निवडणुकीविषयी झडत असताना प्रत्यक्ष मतदानाच्या अवघ्या काही तास अगोदर भारतीय जनता पक्षाने राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना आपला पाठिंबा जाहीर करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला. रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या असून, मतपेटीत भवितव्य बंद झालेल्या नरेंद्र दराडे, शिवाजी सहाणे व परवेज कोकणी या तिघा उमेदवारांचा फैसला गुरुवारी होणार आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्णातील पंधरा मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. अतिशय अटीतटीच्या व चुरशीच्या या तिरंगी लढतीत शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली, तर कॉँग्रेस आघाडीच्या वतीने शिवाजी सहाणे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. भाजपाच्या पाठिंब्यावर जिल्हा विकास आघाडीच्या नावाने परवेज कोकणी यांनी अर्ज दाखल केल्यामुळे या लढतीत खरी रंगत भरली होती. भाजपा आपल्यालाच पाठिंबा देईल, अशी खात्री शिवसेनेने अखेरच्या क्षणापर्यंत बाळगली, तर परवेज कोकणी यांनाही भाजपाच्या पाठिंब्याची प्रतीक्षा होती. परंतु रविवारी पहाटे भाजपाने राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करून शिवसेनेसह परवेज कोकणी यांना जोरदार धक्का व त्याचे स्पष्ट पडसाद प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी दिसून आले. सकाळी ८ वाजता सर्व प्रथम पुंडलिक पांडुरंग खाडे यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी ६ वाजताच मतदान कर्मचारी व केंद्राध्यक्षांनी मतदानाची प्रक्रिया सुरुवात केली. उमेदवार व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या समक्ष रिकामी मतपेटी त्यांना दाखविण्यात आली व त्यानंतर सील करण्यात येऊन त्यावर प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामदास खेडकर यांनी मतदान केंद्राला भेट देऊन तयारीची पाहणी केली, तर साडेसात वाजताच उमेदवार शिवाजी सहाणे यांचे मतदान केंद्र आवारात आगमन झाले. त्यानंतर हळूहळू अतिशय संथपणे मतदारांनी आपली हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या दोन तासांत जिल्ह्णात ६४४ पैकी फक्त ४० मतदारांनी हक्क बजावला म्हणजे ६.२१ टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र साडेअकरा वाजता भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले व काही वेळातच खासगी बसमधून भाजपाच्या मतदारांनी एकत्र येत मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्णात ११५ मतदारांच्या मतांची नोंद करण्यात आली. एक वाजता शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह सर्वच शिवसेनेच्या मतदारांचे आगमन झाले. त्यांच्यासमवेत संपर्क नेते भाऊ चौधरी, दत्ता गायकवाड आदी पदाधिकारी होते. शिवसेनेच्या मतदारांची शिवाजी सहाणे यांनी भेट घेऊन विनंती केली. दीड वाजेच्या सुमारात राष्टÑवादी व त्यापाठोपाठ कॉँग्रेस, मनसेच्या नगरसेवकांनी एकत्र येत आपला हक्क बजावला. दुपारी अडीच वाजेपर्यंत नाशिकच्या मतदान केंद्रांवर १५६ पैकी फक्त सात मतदारांचे मतदान शिल्लक होते. त्यानंतर सुफी जीन व सर्वांत शेवटी दीक्षा लोंढे यांनी मतदान केले. नाशिकचे मतदान सव्वा तीन वाजताच आटोपले. तत्पूर्वी जिल्ह्णातील नऊ मतदान केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान झाले होते, तर त्र्यंबकेश्वर येथे दुपारी २ वाजेपर्यंत फक्त एकमेव मतदाराने आपला हक्क बजावला.निवडणूक वैशिष्ट्ये

सकाळी ८ वाजता नाशिकच्या मतदान केंद्रावर भाजपाचे पुंडलिक पांडुरंग खोडे यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर भाजपाचेच मच्छिंद्र सानप व रूची कुंभारकर हे मतदान केंद्रावर दाखल झाले. सर्वांत शेवटी रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांनी मतदान केले.सकाळी ८ ते १० या दोन तासांत जिल्'ात फक्त६.२१ टक्के मतदारांनी म्हणजेच ४० मतदारांनी मतदान केले. त्यातही सर्वाधिक मतदान मालेगाव येथे २४ मतदारांनी हक्क बजावला.दुपारी १२ वाजता ११५ मतदारांनी जिल्'ात मतदान केले. त्यांची टक्केवारी १७.८६ इतकी होती. तोपर्यंत पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा व सुरगाणा येथे एकाही मतदाराने हक्क बजावला नाही.दुपारी साडेबारा वाजेनंतर मतदाराची मतदान केंद्रावर गर्दी झाली. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या मतदारांसह एकत्रित येऊन मतदानाचा हक्क बजावल्याने दुपारी २ वाजता जिल्'ात ६४४ पैकी ४४० मतदारांनी म्हणजे ६८.३२ टक्के मतदारांनी मतदान केले.* कॉँग्रेस आघाडीने आपल्या मतदारांना सापुतारा येथे ठेवले होते, त्यामुळे तेथून सकाळी निघून मतदारांना स्वतंत्र वाहनाने त्यांच्या मतदान केंद्रावर जबाबदारी सोपविलेल्या पदाधिकाºयांसमवेत पाठविण्यात आले.* शिवसेनेच्या मतदारांना आठ दिवसांपूर्वीच अलिबाग, कर्जत,मढ येथे रवाना करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी सर्वांचे नाशिकमध्ये हॉटेल एक्स्प्रेस इन येथे नेण्यात आले. सकाळी शहरातील सर्व नगरसेवक उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासोबतच मतदान केंद्रावर आले.* भाजपाने आपल्या मतदारांना हॉटेल ज्युपिटर येथे मुक्कामी ठेवले होते. तेदेखील सकाळी एका खासगी वाहनाने मतदान केंद्रावर दाखल झाले.* राष्टÑवादीने या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री राजेश टोपे यांना खास पाठविण्यात आले होते, तर शिवसेनेकडून संपर्क नेते भाऊ चौधरी हे लक्ष ठेवून होते.* जिल्'ातील पंधराही मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून वेब कॅमेºयाच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवण्यात येत होते.* प्रत्येक मतदान केंद्रांवर येणाºया मतदाराचे मतदान करतानाचे व्हिडीओचित्रीकरण करण्यात आले.* निवडणूक निरीक्षक पराग जैन हे स्वत: जातीने उपस्थित होते. त्यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन्, पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ हे होते.

गुरुवारी होणार मतमोजणीया निवडणुकीची गुरुवार दि. २४ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून, सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी दोन टेबल लावण्यात येणार आहे. पसंतीक्रमाने या निवडणुकीत मतमोजणीची पद्धत असल्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

सर्व मतपेट्या जमाचार वाजता मतदानाची मुदत संपल्यावर जिल्ह्णात १०० टक्के मतदान नोंदविले गेले. त्यानंतर मतपेट्या पुन्हा सील करून साहित्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा कोषागरे विभागातील स्ट्रॉँग रूममध्ये रात्रीपर्यंत मतपेट्या जमा करण्यात आल्या. नाशिक मतदान केंद्रांच्या केंद्राध्यक्ष वासंती माळी यांची पहिली मतपेटी जमा करण्यात आली.