कळवण : श्री गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित कॉलेज आॅफ फार्मसी, मानूर महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल ९८.३० टक्के लागला असून यात साक्षी शरद आहेर प्रथम क्र मांक तर श्वेता मोतीलाल सांबरे व मयूर हिरामण शिंदे याने अनुक्र मे दूसरा व तिसरा क्र मांक मिळविला.अंतिम वर्ष डी फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला असून गणेश भगवान शिरसाठ याने प्रथम क्र मांक मिळविला. श्रुष्टी राजेंद्र पाटील व बधान प्रसाद अनिल बधान यांनी संयुक्तीक दुसरा क्र मांक मिळविला तर संकेत भास्कर निकम याने तिसरा क्र मांक मिळविला. महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील एकूण ४९ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी, तर ४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य किशोर कोठावदे यांनी दिली.सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक वर्गाचे संस्थेचे संस्थापक डॉ जे. डी. पवार, अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार, संस्थेचे उपाध्यक्ष गजानन सोनजे, कार्यकारी संचालक बी. एन. शिंदे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ अविश मारू, महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर कोठावदे व श्रावण आहेर इतर पदाधिकारी यांनी कौतूक केले.
मानूर डी.फार्मसीची १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 8:04 PM
कळवण : श्री गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित कॉलेज आॅफ फार्मसी, मानूर महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल ९८.३० टक्के लागला असून यात साक्षी शरद आहेर प्रथम क्र मांक तर श्वेता मोतीलाल सांबरे व मयूर हिरामण शिंदे याने अनुक्र मे दूसरा व तिसरा क्र मांक मिळविला.
ठळक मुद्देसाक्षी आहेर, गणेश शिरसाठ प्रथम