नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२) नवीन ६७८ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४७८९ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त आणि कोरोनामुक्त नागरिकांची संख्या कोरोनाबाधितांच्या दीडपट होती. त्यामुळे एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ८०८१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २७५, नाशिक ग्रामीणला ३७७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १४ तर जिल्हाबाह्य १२ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १३, ग्रामीणला २०, मालेगाव मनपा क्षेत्रात २ असा एकूण ३५ जणांचा बळी गेला आहे.
इन्फो
उपचारार्थी ८ हजारांवर
जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्येत सातत्याने घट येत असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या अवघी ८ हजारांवर आली आहे. त्यातदेखील नाशिक ग्रामीणच्या रुग्णांची संख्या ४२६४ तर नाशिक शहराच्या रुग्णांची संख्या ३५७९ तर मालेगाव मनपाचे १९९ आणि जिल्हाबाह्य ३९ रुग्णांचा समावेश असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या ८०८१ पर्यंत खाली आली आहे.