नाशिक : धोकादायक झालेली काजीची गढीमुळे पावसाळ्यात आपत्ती ओढावू शकते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका प्रशासनाला धडकी भरली आहे. मागील आठवड्यात गढी कोसळल्याची रंगीत तालीमेनंतर गुरूवारी (दि.२२) अग्निशामक दलासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी गढीवर जाऊन ध्वनिक्षेपकावरून स्थलांतरण करण्याचे आवाहन केले. जुने नाशिकमधील काजीची गढी हा परिसर या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये झालेल्या प्रभाग रचनेनूसार पश्चिम विभागामध्ये समाविष्ट झाला आहे. गोदाकाठाच्या दिशेने गढी ढासाळत असल्याकारणाने या गढीच्या काठावरील सुमारे शंभराहून अधिक रहिवाशांना पालिकेच्या वतीने पंधरवड्यापुर्वी नोटीसा बजावल्या होत्या. गढीची आपत्ती येऊ शकते आणि दुर्देवाने पावसाळ्यात गढी कोसळल्याची आपत्ती ओढावल्यास ‘रेस्क्यू आॅपरेशन’ प्रभावीपणे अग्निशामक व आपत्ती विभागाकडून राबविले जावे यासाठी गेल्या शुक्रवारी ‘मॉकड्रिल’ भद्रकाली पोलीस व अग्निशामक विभागाच्या वतीने घेण्यात आले होते. एकूणच गढीचा धोका प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने घेतला असला तरी गढीच्या सुरक्षेसाठीदेखील गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.गुरूवारी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा गढी चढली. गढीवरील रहिवाशांना धोक्याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. गढीची माती ढासळत असून गढीवरील काठाची घरांना धोका उद्भवू शकतो त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासह पावसाळ्याची चार महिने तात्पुरत्या स्वरुपात का होईना स्थलांतर करा, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी नितीन नेर, मुख्यालयाचे स्टेशन उप अधिकारी दिपक गायकवाड, कार्यकारी अभियंता पी.बी.चव्हाण यांच्यासह आदि उपस्थित होते.
१०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत, १६ लाख ९२ हजार रुग्णांना मिळाले जीवदान
By admin | Published: June 22, 2017 7:40 PM