शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मनपाला अकरा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 1:44 AM

घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ८५ कोटी आत्तापर्यंत वसूल झाले आहेत. निवडणूक कामात बहुतांशी कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी विभागाची अडचण झाली आहे.

ठळक मुद्देअभय योजना फलदायी : यंदा नियमित वसुलीचे ८५ कोटी जमा

नाशिक : घरपट्टीतील वर्षानुवर्ष थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन टप्प्यांत ११ कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय चालू वर्षात १५० कोटी रुपयांची रक्कम वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते त्यापैकी ८५ कोटी आत्तापर्यंत वसूल झाले आहेत. निवडणूक कामात बहुतांशी कर्मचारी गुंतल्याने घरपट्टी विभागाची अडचण झाली आहे.महापालिकेच्या घरपट्टी विभागात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. जुनी थकबाकी वसूल करताना अनेक अडचणी असून मूळ रकमेबरोबरच शास्तीदेखील लावली जात असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी महापालिकेने थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याचा धडाका सुरू केल्यानंतर काही प्रमाणात वसुली झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा ढेपाळली. प्रशासनाने काही बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे लिलाव काढले होते, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान, आता महापालिकेने सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी शास्तीत सवलत देऊन वसुलीची अभय योजना जारी केली होती. १६ ते ३० सप्टेंबर राबविलेल्या योजनेत ७५ टक्के सवलत होती. त्यात एकूण ९ कोटी रुपये वसूल झाले होते. त्यानंतर आता १ ते १० आॅक्टोबर दरम्यान शास्तीत ५० टक्के सूट देऊन योजना राबविण्यात आली होती. यात ४ हजार ५७१ नागरिकांनी २ कोटी ५३ लाख ३१ हजार ४३ रुपये वसुली करण्यात आली आहे.विभागनिहाय वसुलीची कामगिरीसातपूर विभागातील ४८५ थकबाकीदारांनी २८ लाख २८ हजार ५१२ रुपये, नाशिक पश्चिम विभागात ३१ लाख ७५ हजार ८६२ रुपये, नाशिक पूर्व विभागातून ८३२ थकबाकीदारांनी ६२ लाख २५हजार ६५२ रुपये, पंचवटी विभागातून ९१२ थकबाकीदारांनी ४५ लाख ३९ हजार ९२६ रुपये त्याचप्रमाणे सिडको विभागातून १ हजार ७९ थकबाकीदारांनी ४६ लाख ०३ हजार १३८, तर नाशिकरोड विभागातून ८३४ थकबाकीदारांनी ३९ लाख ५७ हजार ९५३ रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर