चांदवड - मुंबई- आग्रारोडवर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात हॉटेल स्वागत जवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावकडे जाणारी काळी पिवळी जीप (एम.एच. १६ /बी/ ६९४५) हिने पुढे उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगाने धडक दिल्याने जीपमधील अकरा प्रवासी जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे. आयशर चालक धडक बसताच घटनास्थळावरु न पसार झाला .काळी पिवळी जीपमधील जखमी पुढील प्रमाणे मंगेश जाधव (३५), धनंजय गोविंद गवळे (८), अनिता विश्वास सोनवणे (४१), सोनल बाळकृष्ण खैरनार (२६),गोविंद संभाजी गवळे (३०),छोटू पाटील (४५),चेतन शिवाजी गायकवाड(२७), अनुराग बाळकृष्ण खैरनार (०३), समीर श्यामकांत देशंपाडे (३०) ,सर्व रा. नाशिक तर अनुसया पोपट ढोबळे (७०) रा. धोंडबे ,फिर्यादी संतोष दगडू खैरनार (४२) रा. नाशिक हे अकरा जण जखमी झाले.तर पोपट यशवंत ढोबळे (धोंडबे ) यांना मार लागला नाही हे दोघे पती पत्नी वडाळीभोई येथून राहुड येथे जात होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांदवड उपजिल्हा रु ग्णालयात प्रथमोपचार करु न अधिक उपचारासाठी नाशिक व मालेगावला पाठविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सोमा कंपनीच्या गस्तीपथक,रु ग्णवाहिका व १०८ रूग्णवाहिकेवरील डॉ.सतीश गांगुर्डे यांनी सर्व जखमींना उपजिल्हा रु ग्णालयात आणले. अपघातात काळीपिवळी जीपचा पुढील भाग पुर्णपणे चक्काचूर झाला असून चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी, हवालदार बापू चव्हाण , जी.टी. मोरे हे घटनास्थळी गेले. त्यांनी संतोष दगडू खैरनार यांच्या फिर्यादीवरु न गुन्हा नोंदविला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
चांदवडनजिकअपघातात ११ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 3:26 PM