शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

नाशिकरोड परिसरातील ११ धार्मिक स्थळे जमीनदोस्त

By admin | Published: November 18, 2016 12:07 AM

महापालिका : आजही होणार कारवाई

नाशिकरोड : परिसरातील विविध ठिकाणी अनधिकृत ११ धार्मिक स्थळे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकांकडून गुरुवारी सकाळी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अनुराधा टॉकीज, दत्तमंदिररोड गाडेकर मळा, रोकडोबा वाडी, जयभवानी रोड साम्राज्य सोसायटी, फर्नांडीसवाडी, लोणकर मळा, दत्तमंदिररोड मनपा शाळा क्र. १२५, गुरुद्वारासमोर एलआयजी कॉर्नर, जेलरोड मोनिक सोसायटी, सानेगुरुजीनगर महाजन हॉस्पिटल, इंगळेनगर पाण्याची टाकी या ठिकाणची धार्मिक स्थळे मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली.बहुतेक ठिकाणी धार्मिक स्थळांचे कामकाज पाहणारे व भाविकांनी स्वत:हून मूर्ती व इतर साहित्य काढून घेतले होते. काही ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकासोबत असलेल्या पुजाऱ्याने मूर्ती काढण्यापूर्वी पूजा करून ती मूर्ती काढल्यानंतर धार्मिक स्थळ पाडण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर, कर्मचारी यांनी सदर मोहीम राबविली. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)