११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:24 PM2020-12-23T19:24:05+5:302020-12-23T19:57:22+5:30

ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले. 

11 suspects in custody: Eight magazines, 32 cartridges seized | ११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

Next
ठळक मुद्देमध्यप्रदेशमधून गावठी पिस्तुलांची तस्करी उधळलीग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सतर्कता

नाशिक : आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण पोलिसांना काही तालुक्यांमध्ये अवैध शस्त्रास्त्रांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधिक्षकांकडून देण्यात आले होते. लासलगावात एका संशयिताला पोलिसांनी छापा टाकून अटक केली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुलसह पाच काडतुसे आढळून आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी छडा लावत तब्बल ११ संशयित आरोपींना गावठी कट्टयांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ६ गावठी पिस्तुलांसह ८ मॅग्जीनसह ३२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

मालेगाव, चांदवड, येवला, लासलगाव या तालुक्यांमधील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी तपासचक्रे फिरविली. मिळालेल्या गुप्त माहितीच्याअधारे लासलगावातून संशयित विपुल यमाजी आहिरे यास एरिगेशन कॉलनीमध्ये छापा टाकून अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांनी गावठी पिस्तुल व पाच काडतुसे मिळून आली. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गावठी पिस्तुल देणारा मध्यप्रदेशमधील म्होरक्या तसेच अन्य खरेदीदारांची माहिती पोलिसांकडे उघड केली. यावरुन तांबे यांनी त्वरित सहायक निरिक्षक राहुल वाघ, उपनिरिक्षक रामकृष्ण सोनवणे, हवालदार भागवत पवार, दौलत ठोंबरे आदींचे पथक तयार करुन गावठी पिस्तुलांची तस्करीची साखळी खिळखिळी करण्याच्या सुचना केल्या. पोलिसांनी सापळा लावून संशयित संतोष ठाकरेकडून (रा.विंचुर) दोन गावठी पिस्तुल, १४ काडतुसे, केशव माधव ठोंबरे (रा.पिंपळद) याच्याकडून एक गावठी कट्टा व चार काडतुसे तसेच संशयित सागर वाघकडू एक गावठी कट्टा व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. एकुण ११ संशयितांना न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

एजंट, हेल्परांच्याही बांधल्या मुसक्या
गावठी पिस्तुल व काडतुसे बाळगणाऱ्या वरील चौघांच्या संपर्कात राहून संभाव्य खरेदीदार शोधून देणे तसेच पिस्तुलांच्या वाहतुकीसाठी मदत करणारे संशयित दिपक पोळ, पंकज चंद्रकांत वानखेडे, विनोद सोपान तांबे, अजीम अल्ताफ शषख, करन जेऊघाले, पवन आनंद नेटारे यांच्याही मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात पोलिसांना सराईत गुन्हेगार सायमन ऊर्फ पापा पॅट्रीक मॅनवेलसह मध्यप्रदेशमधील उमर्टी गावातून देशी पिस्तुल, काडतुसांचा पुरवठा करणारा म्होरक्या शेखर भाई यांना अटक करण्याचे आव्हान आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सतर्कता
ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच तस्करी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कायदासुव्यवस्था बिघडविणाऱ्या संभाव्य समाजकंटक पोलिसांच्या रडारवर असल्याचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: 11 suspects in custody: Eight magazines, 32 cartridges seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.