नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात अचानकपणे हातापायांच्या सांधेदुखीच्या आजाराने डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. या आजाराचे नेमके निदान होत नसल्याने नागरिकही धास्तावले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून सोमवारी (दि.१८) प्रसिद्ध होताच महापालिका व राज्य शासनाचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. प्रशासनाच्या हिवताप नियंत्रण विभागाचा चमू वडाळागावात दाखल झाला. तातडीने राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण ११० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ६५ रुग्णांना सांधेदुखीचा आजार असल्याचे समोर आले आहे. वडाळागाव परिसरातील रामोशीवाडा, जय मल्हार कॉलनी, बाराखोली परिसर, राजवाडा, माळी गल्ली, कोळीवाडा, गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, मनपा शाळेचा परिसर या गावठाण भागात अचानकपणे नागरिकांना सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला. या भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ताप, डोकेदुखी किंवा अन्य कोणताही त्रास नसताना केवळ पायाच्या घोट्यापासून संपूर्ण तळवा आणि हाताच्या बोटांमध्ये होणाऱ्या असह्य वेदना या गूढ आजाराने वडाळागावातील नागरिक हैराण झाले आहेत. हा परिसर नेहमीच सार्वजनिक स्वच्छतेबाबत चर्चेत असतो. महिनाभरापूर्वी विषाणूजन्य तापाच्या आजाराने नागरिक फणफणले होते. तापाचे रुग्ण वाढले होते. ताप नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा पंधरवड्यापासून हाता-पायांचे पंजे आणि मनगट, घोटा, गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याने नागरिक बुचकुळ्यात पडले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध करण्यात आले. सांधेदुखीचा गूढ आजार, अशी चर्चा येथे सुरू झाली होती. सदरचे वृत्त सोमवारी झळकताच महापालिक ा हिवताप नियंत्रण विभाग, शहरी आरोग्य विभाग, राज्य शासनाचा हिवताप नियंत्रण विभाग यांना खडबडून जाग आली.तुंबलेल्या गटारीवडाळागाव परिसरात डासांच्या उच्छादासह दूषित पाणीपुरवठा आणि तुंबलेल्या गटारींची समस्याही संसर्गजन्य साथीच्या आजारांच्या फैलावाला कारणीभूत ठरत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, भूमिगत गटार दुरुस्ती विभागानेही तत्काळ वडाळागाव परिसरात उपाययोजना करण्याची गरज आहे. माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, कोळीवाडा आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा पंधरवड्यापासून होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.सकाळीस चमू दाखलसोमवारी सकाळी १० वाजेनंतर आरोग्य प्रशासनाचा संपूर्ण चमू वडाळागावात दाखल झाला. राज्य हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाºयांनी रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी संकलन केले. सुमारे पन्नासहून अधिक रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून जवळपास ११० रुग्ण वरील परिसरात आढळून आले आहेत.
वडाळागाव परिसरात तपासणीत आढळले ११० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:14 AM