सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकुंभ, शाळा अंगणवाड्यांच्या पाण्याच्या टाक्या, हातपंपांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. सिन्नर तालुक्यातील ११४ गावात १७ आणि १८ जून असे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून केली जाणारी टीसीएल साठवणूक आणि हाताळणी, नमूना तपासणी याचीही पडताळणी या मोहिमेदरम्यान संपर्क अधिकाऱ्यांकरवी केली. ग्रामपंचायतींच्या जलकुंभासोबतच शाळा, अंगणवाड्यांतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताही करण्यात आली. स्वच्छता केल्याची तारीख आॅइल पेंटच्या सहाय्याने सदर जलस्त्रोतावर नमूद करण्यात आली.पाण्याच्या टाक्यांमध्ये सहा इंच उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी काढून टाकी रिकामी केली. आउटलेट बंद करून टाकीच्या आतील भिंती, तळ तारेच्या ब्रशच्या सहाय्याने घासण्यात आल्या. त्या पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने भिंती आणि तळ स्वच्छ धुवून घेतला. शाळा, अंगणवाड्यांच्या सिमेंट, प्लॅस्टिक आणि लोखंडी टाक्या धुण्यासाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली. तर हातपंप शुद्धीकरण करताना पंपाच्या झाकणाचे तीन बोल्ट काढून त्यात सहा इंचसाठी ३०० ग्रॅम तर चार इंचसाठी १५० ग्रॅम ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून शुद्ध करण्यात आले. स्वच्छ करण्यात आलेल्या टाक्या एक दिवस पाण्याविना ठेवून कोरडा दिवस पाळण्यात आला.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे.
११४ ग्रामपंचायतींमधील जलस्त्रोतांची झाली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:18 PM