शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

११५ विना हेल्मेट दुचाकीस्वारांना ‘दणका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:54 AM

विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नाशिक : विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.शहर वाहतूक नियंत्रण शाखा व विविध पोलीस ठाण्यांमधील पोलिसांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२७) रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारला. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्ते अपघातात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. यासाठी पुन्हा एकदा जे दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करताना दिसून आले नाही, त्यांच्याकडून दंड वसूल केला गेला. यावेळी वाहतूक नियमांचे पालन गरजेचे असल्याबाबत प्रबोधनही करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटसक्तीची मोहीम राबविली जात आहे. आयुक्तालय हद्दीत सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांनी या मोहिमेवर नियंत्रण ठेवले. सर्व पोलीस ठाणेनिहाय नाक्यांवर हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सकाळी नऊ वाजेपासून आयुक्तालय हद्दीत कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. येत्या शनिवार (दि.३१) पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावणे, झेब्रा क्रॉसिंगचे पालन, सिग्नलपालनासह आदी वाहतूक नियमांचे पालनाबाबत जागृती केली जात आहे. तसेच दुचाकीवर जाताना मोबाइलचा सर्रास वापर, एका दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा प्रवास, मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे.पोलीस आयुक्तांच्या वतीने तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हेल्मेट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे सदर मोहीम मुख्य रस्त्यांवर न राबविता गंगापूररोड तसेच मुंबई नाका या ठिकाणी प्राधान्याने राबविण्यात आली.दरम्यान, सदर मोहीम सुरु करण्यापूर्वी आयुक्तालयाने यासंदर्भातील माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाशिककरांसाठी जाहीर केली होती. अचानक मोहीम न राबविता वाहनधारकांना संधी मिळावी यासाठी वाहनधारकांना सूचित करण्यात आले होते. सकाळी सुरु झालेली ही मोहीम दुपारनंतर मात्र थंडावली. या मोहीमेत शंभरपेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना समज देण्यात आली. सदर मोहीम सुरुच राहणार आहे.रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणवर्ष गंभीर अपघात किरकोळ अपघात मयत एकूण अपघात(जाने. ते जुलै)२०१८ - १७९ ४१ १२३ ३४७२०१९- १६८ ५२ ९८ ३१६मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शहरात रस्ते अपघात कमी झाल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा आहे. अपघातासोबत अपघाती मृत्यूच्या संख्येतदेखील घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातांमध्ये ३१ने तर अपघातात जागीच मृत्यूच्या प्रमाणात २७ ने घट झाली आहे. विशेषत: हेल्मेटचा वापर वाढल्याने अपघाती मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस