नाशिक : कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, किमान दोन त्रैमासिक वीज बिल ग्राहकांनी भरणे अपेक्षित आहे. अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास १ हजार १८३ कोटी रु पयांची थकबाकी असून, थकीत रक्कम तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.नाशिक परिमंडलातील नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ६ लाख ६२ हजार कृषिपंप वीजजोडण्या आहेत. यातील अवघे तीन हजार ग्राहक वगळता उर्वरित ६ लाख ५९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ३ हजार ४६९ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. त्यादृष्टीने आता कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, एप्रिल ते सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत आकारण्यात आलेले चालू बिल (देयक) म्हणजेच दोन त्रैमासिक बिले न भरणाºया कृषिपंपांची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहर मंडलातील १ लाख ६५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९१ कोटी रु पयांची थकबाकी आहे. यातील १ लाख ६४ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी रु पयांची चालू बिले थकीत आहेत. मालेगाव मंडलातील १ लाख ३९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९२ कोटी रु पयांची वीज बिले थकीत असून, यातील १ लाख ३८ हजार ३०० ग्राहकांकडे ३५ कोटी ४२ लाख रु पयांची चालू थकबाकी आहे.
कृषिपंपांची ११८३ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:45 AM