गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.
आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा काार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.
यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत. n लाेकमत न्यूज नेटवर्क
गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या ग्रामपंचायतीचा निडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीमध्ये राजकीय आखाडा रंगणार आहे. गेल्या मार्च ते मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली होती; मात्र कोरोनाचा प्रभाव आणि लागू करण्यात आलेला लाॉकडाऊन यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आली होती.
आता या निवडणूक जाहीर झाल्या असून, येत्या २३ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामंपाचायतीमध्ये नाशिक तालुका-२५, त्र्यंबक-३, दिंडोरी ६०, इगतपुरी-०८, निफाड-६५, सिन्नर-१००, येवला-६९, मालेगाव-९९, नांदगाव-५९, चांदडव-५३, कळवण-५९, बागलाण-४० आणि देवळा -११ या प्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारे उमेदवार हे मतदाचा हक्क बजावणार आहेत.
यंदा निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी कमी असल्याने उमेदवारांची धावपळ होणार आहे. त्यातच त्यांना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असलेल्या ग्रामपंचायतींच्या हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटात होत असलेल्या या निवडणुकीवर काही मर्यादा येणार आहेत.
--इन्फो--
अर्ज दाखल करण्यापूर्वी हे नक्की करा!
१) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे अपेक्षित आहे. अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे. उमेदवाराला अपत्याचे घोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र तसेच मत्ता दायित्व घोषणापत्र अर्जासोबत द्यावे लागणार आहे.
२) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे. राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित छायाप्रत, वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रकरण सादर केलेल्या प्रस्तावाची बारकोड असलेली पोहोच पावती आवश्यक आहे. या शिवाय प्रत्येक उमेदवाराला राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडावे लागणार आहे.