शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 8:13 PM

सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे.

ठळक मुद्देमंगळवारी जिल्ह्यात नव्याने एकूण १,०१३ कोरोना संशयित रूग्ण सर्वाधिक ५११ संशयित नाशिक शहरात

नाशिक : कोरोनाचे संक्रमण शहरासह जिल्ह्यात अद्यापही सुरूच आहे. शहरात आज मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी सात वाजेपर्यंत १२२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तसेच जिल्ह्यात एकूण १६९ कोरोना रूग्ण मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा आता १२ हजार ६५७ इतका झाला आहे. आज जिल्ह्यात एकूण पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी तीघे शहरातील होते. मृतांचा जिल्ह्याचा एकूण आकडा आता ४७२ तर शहराचा एकूण मृतांचा आकडा २५६वर पोहचला आहे.कोरोना आजाराचे संक्रमण वेगाने होत असले तरीदेखील नागरिकांमध्ये अद्यापही त्याबाबत फारसे गांभीर्य दिसून येत नाही. नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत नसून उपाययोजनांकडेही दुर्लक्ष करू लागले आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र या आदेशाचा अनेकांकडून दररोज भंग केला जातो. सार्वजनिक ठिकाणी अजूनही सर्रासपणे थूंकीच्या पिचकाऱ्या सोडल्या जातात, हे दुर्दैवच!जिल्ह्यात मंगळवारी एकूण ४७३ कोरोनाबाधित रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. शहरात विडीकामगारनगर, अशोकनगर सातपूर, सिडको, पेठरोड, हिरावाडी, पंचवटी, सावरकरनगर गंगापूररोड, नाशिकरोड, जेलरोड, समतानगर टाकळी, इंदिरानगर, म्हसरूळ आदी भागात कोरोनाबाधित रूग्ण अधिक मिळून आले.सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयितांपैकी १ हजार १११ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात मंगळवारी नव्याने एकूण १,०१३ कोरोना संशयित रूग्ण आढळून आले. सर्वाधिक ५११ संशयित नाशिक शहरातील आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस