आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी योजनेत सहभागासाठी आवाहन केले होते. योजनेच्या समन्वयक सुषमा मानकर यांच्यासह मार्गदर्शक पथकाने गावोगावी बैठका घेवून सहभागासाठी जनजागृती केली होती. ३१ जानेवारी अखेर १२४ गावांनी सहभागासाठी अर्ज सादर केले. सहभागी झालेल्या गावांतून प्रत्येकी ५ ते ९ जणांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. चांदवड तालुक्यातील कळमदरे येथे चार दिवसाचे निवासी शिबिर निश्चित झाले आहे. प्रशिक्षणात जलसंधारणाची कामे, श्रमदान, लोकसहभाग, माती परिक्षण, पाणी बजेट, माथा ते पायथा जलसंधारणाची विविध कामे करण्याबाबत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनी आपला अनुभव व स्पर्धेच्या काळात करावयाची कामे गावाशी चर्चा करु न करण्याबाबतचे धोरण आहे. लोकसंख्येने मोठी असलेल्या वावी, ठाणगाव या गावांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. वावी येथे पिण्याच्या पाण्याची कायम दुष्काळ आहे. दुष्काळाचे चटके शोषणाऱ्या वावीत स्पर्धेच्या माध्यमातून उपाययोजना करणे शक्य होते. तसेच सुळेवाडी, दोडी खुर्द, शिवाजीनगर या गावांनीही स्पर्धेत सहभागासाठी अर्ज सादर केले नाहीत. गतवर्षी तालुक्यातील कोनांबे गावाने तिसºया स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्र मांक पटकावला. वडझिरेचा दुसरा तर आगासखिंडचा तिसरा क्रमांक आला होता. यंदा ही गावे राज्यस्तराच्या स्पर्धेत येण्यासाठी चमकदार कामिगरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तीनही गावांकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.
सिन्नर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत १२४ गावांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:15 PM