नवा विक्रम : डेंग्यूचे थैमान कायम
नाशिक : महापालिकेने डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचा कितीही दावा केला असला तरी शहरातील डेंग्यूचा प्रकोप मात्र कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात अवघ्या बारा दिवसांत शहरात डेंग्यू संशयितांची संख्या ही २७१ वर पोहचली आहे. त्यात डेंग्यूचे १२६ रु ग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याने शहरातील डेंग्यूने राज्यात तिसरा नंबर मिळवला आहे.आॅगस्टमध्ये ९७ डेंग्यूचे रु ग्ण सापडले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली होती. आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर संशयित डेंग्यू रुग्णांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. त्यानंतरही डेंग्यूचे थैमान सुरू आहे. प्रशासन मात्र राज्यात मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक तिसºया क्रमांकावर आहे. यावरच समाधानी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सव्वादोनशे रुग्ण कमी असल्याने रुग्ण संख्येत ३० ते ३५ टक्केघट झाल्याचा दावा आरोग्य विभाग करीत आहेत.गेल्या काही वर्षांपासून डेंग्यू नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. महापालिका सार्वजनिक आरोग्य आणि डास निर्मूलनावर मोठ्या प्रमाणात खर्च करते. चालू महिन्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या बघता ही धोकादायक स्थिती मानली जात आहे. चालू महिन्यात अजून १८ दिवस शिल्लक असून, डेंग्यू संशयिताचा आकडा हा पाचशेच्या पार जाण्याची शक्यता आहे.