मालेगाव : शहरासह तालुक्यात आज पुन्हा १३ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले. ११५ जणांचे तपासणी अहवाल आले. त्यात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये संगमेश्वरातील माळीनगर येथील ३३ वर्षांची महिला, संगमेश्वरातील सुभाष चौक येथील ५८ वर्षीय पुरुष, मसगा महाविद्यालयातील २४ वर्षीय महिला बाधित मिळून आले. याशिवाय तालुक्यातील झोडगे येथील संताजी चौकातील ४२ वर्षीय पुरुष, रावळगाव येथील २९ वर्षीय तरुण, सोयगाव येथील चव्हाण नगरमधील ६६ वर्षीय महिला, सात वर्षांची बालिका बाधित मिळून आले. याशिवाय मनमाडच्या कोतवालनगरमधील ६६ वर्षीय इसम बाधित मिळून आला. मालेगाव कॅम्पातील चर्चगेटनजीक राहणाऱ्या ५७ वर्षीय इसम, तालुक्यातील चिंचगव्हाण येथील २२ वर्षीय तरुण, कॅम्पातील पवार गल्लीतील ६५ वर्षीय इसम, २७ वर्षीय महिला, प्रयास हॉस्पिटलमधील २३ वर्षीय महिला बाधित मिळून आले. चांदवड तालुक्यातील लोकप्रतिनिधीही बाधित चांदवड तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते घरातच क्वॉरंटाइन झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन संबंधित नेत्याने केले आहे. दरम्यान, सदर नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चांदवड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक चिंताग्रस्त असून, आरोग्य प्रशासनाकडूनही दक्षता घेतली जात आहे. मात्र या नेत्याच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर त्यांच्या संपर्कातील लोक धास्तावल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------चांदवड तालुक्यातील चार अहवाल पॉझिटिव्हतालुक्यात बुधवारी (दि. २२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पुन्हा चार अहवाल पॉझिटिव्ह आले असून, तीन दिवसात बाधितांची संख्या २३ झाली आहे. त्यात वडाळीभोई येथील दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर चांदवड येथील फुलेनगर पॉझिटिव्ह रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. १४ अहवालातून चार पॉझिटिव्ह तर दहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत.