मालेगाव : गुजरात राज्यातुन मालेगावी कत्तलीच्या हेतुने १३ उंटांची ट्रकमध्ये कोंबुन वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी १३ उंट व ट्रक असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ४ वाजेच्या सुमारास मालेगाव- सटाणारोडवर दाभाडी शिवारातील इंदिरानगर येथे ही कारवाई करण्यात आली. गुजरातकडून मालेगावकडे कत्तलीच्याहेतुने उंट ट्रकमधुन येत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, देविदास निकम, नितेश खैरनार, दिनेश सरावत, नवनाथ सूर्यवंशी, अभिजित साबळे आदिंनी शहरालगतच्या दाभाडी येथील इंदिरानगर येथे सापळा रचला होता. सटाणा- मालेगाव रस्त्यावरुन येणाºया वाहनांची तपासणी सुरू केली होती. ट्रक (क्र. जी. जे. २४. व्ही. ४९०१) हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने ट्रक पळवून नेला. विशेष पथकाने पाठलाग करुन ट्रक अडविला. या ट्रकमध्ये १३ उंट कोंबुन बांधुन ठेवलेले आढळून आले. पथकाने ट्रकचालक सुरेशजी पारखाजी ठाकुर रा. चंद्रावती, सिद्धपुर गुजरात, दिनेश सोमाभाई सेंडमारवत रा. मैसाणा, गुजरात, असगरजी अख्तरजी भागपत रा. उत्तर प्रदेश या तिघांना अटक केली आहे. तर गुल्लु (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरुद्धही छावणी पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षणक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-------------अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व पथकाने गुजरात राज्यातुन मालेगावकडे कत्तलीच्या हेतुने आणली जाणारे १३ उंट व ट्रक असा सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उंट जप्तीचीही पहिलीच कारवाई मानली जात आहे.
कत्तलीच्या हेतुने आणलेली १३ उंट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 8:34 PM