कोरेानाच्या दुुसऱ्या लाटेत सामान्यत: गंभीर आजार नसलेले नागरिक गृहविलगीकरणात राहत असले तरी गंभीर आजार झालेल्या नागरिकांना मात्र रुग्णालयात दाखल व्हावे आणि ऑक्सिजन बेडस्साठी शोधाशाेध करावी लागली होती. अनेकांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही. त्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार नाशिक महापालिकेने आता तिसऱ्या लाटेची तयारी करताना ऑक्सिजन बेडवर भर दिला आहे.
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात सध्या पाचशे ऑक्सिजन बेड आहेत, तेथे आता आणखी दोनशे बेड वाढवण्यात येेणार आहेत, तसेच संभाजी स्टेडियम येथे दाेनशे, तर ठक्कर डोम येथे तीनशे ऑक्सिजन बेड असणार आहेत. पंचवटीत मीनाताई ठाकरे स्टेडियममध्येही दोनशे बेड ऑक्सिजनचे असतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
अंबड येथील आयमा आणि अन्य उद्योगांच्या मदतीने पाचशे बेडस्चे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. महापालिकेच्या वतीने या कोविड सेंटरवर दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असले तरी उद्योजकांच्या वतीने औद्योगिक शेड आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याठिकाणी महिंद्रा कंपनी, टीटीके तसेच जिंदाल या कंपन्या पीएसीए ऑक्सिजन प्लँट उभारणार आहेत. याशिवाय महिंद्रा कंपनीकडून जनरेटर बॅकअपचादेखील पुरवठा केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो...
नेहरूनगर रुग्णालयावर फुली
नेहरूनगर रुग्णालयात कोरोना रुग्णालय सुरू करण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र, त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार असून, त्यामुळे या प्रस्तावावर प्रशासनाने फुली मारली आहे. केंद्र शासनाचे हे रुग्णालय बंद आहे. कोराेनामुळे ते सुरू करण्याची तयारी करण्यात आली होती. आयुक्त कैलास जाधव, तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्याठिकाणी पाहणीदेखील केली होती. मात्र, तीन कोटी खर्च करून पुन्हा कर्मचारी पुरवठादेखील महापलिकेलाच करावा लागणार असल्याने या प्रस्तावावर फुली मारण्यात आली आहे.