नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ५) एकूण १३३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १११ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात एकाचा मृत्यू झाला असल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०५६ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ६५१ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार ४३२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१६३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९७, नाशिक ग्रामीण ९६.२६, मालेगाव शहरात ९३.१२, तर जिल्हाबाह्य ९४.९८ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ६ हजार ५३९ असून, त्यातील ३ लाख ८९ हजार ११८ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ६५१ रुग्ण बाधित आढळून आले असून, ७७० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.