कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोविड रुग्ण वाढत आहेत. तसेच शासनाने १८ वर्षांपुढील सगळ्यांना लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे.
एकदा कोविड लस घेतली तर पुढील महिनाभर रक्तदान करता येणार नसल्याचे सांगण्यात येते. भविष्यात रक्ताचा तुटवाडा भासू नये त्याअनुषंगाने आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज जाधव यांनी सिन्नर शहरातील विजयनगर भागात असणाऱ्या वारकरी भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित केले.
आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. ३० एप्रिल रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टवर अनेक तरुण या रक्तदान शिबिरास तरुण सहभागी झाले. तब्बल १३६ रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
याप्रसंगी विजयनगर मित्र मंडळाचे सचिन उगले, गणेश उगले, मनोज उगले, देवा आवारे, स्वप्निल जाधव, योगेश मानकर, चंदन गवळी, रंजीत उगले, सूरज बलक, राहुल बलक, नीलेश मोराडे, नगरसेवक संतोष शिंदे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, प्रशांत सोनवणे, संकेत कासट, आधार ब्लड बँक संगमनेर यांच्यातर्फे प्रदीप जाधव, योगेश सांगळे, पृथ्वीराज गुळवे, संध्या डोळसे, प्रवीण नेहे उपस्थित होते.