इंदिरानगर : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाण्यापूर्वी पत्नीने घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नीने कचºयाच्या डब्याजवळील प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला अन् पतीने कचरा समजून तो इतर कचºयाबरोबरच गोणीत भरून खतप्रकल्पावर नेऊन टाकला़ कचरावेचक महिला व तिच्या मुलीस हा दागिन्यांचा डबा मिळाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेस मिळाली अन् त्यांनी संबंधित कुटुंबीयांचा शोध घेत कचरावेचक महिलेच्या हस्ते या कुटुंबीयांचे दागिने शुक्रवारी (दि़३) परतही केले़ दरम्यान, संबंधित कुटुंबाने या प्रामाणिकपणाबाबत महिलेस पोलिसांच्या हस्ते दहा हजार रुपयांची बक्षिसी देऊन सत्कार केला तसेच अजून प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे उद्गारही काढले़पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरमधील शरद व सरिता दळवी हे दाम्पत्य लक्ष्मीपूजनाला गावी जाण्यासाठी तयारी करीत होते़ सरिता दळवी यांनी घरातील साडेतेरा चौदा तोळे सोन्याचे अन् ३४७ ग्रॅम चांदीचे असे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने प्लॅस्टिकच्या डब्यात टाकून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले़ सदर पिशवी ही बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरातील कचºयाच्या डब्याशेजारी ठेवली होती, तर शरद दळवी यांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी घरातील सर्व कचरा एका गोणीत टाकला त्यामध्ये दागिन्यांची प्लॅस्टिकची पिशवीही टाकली़ घंटागाडी उशिरा येणार असल्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी कचºयाची गोणी दुचाकीवरून मनपाच्या विल्होळी येथील खत प्रकल्पाच्या कोपºयावर नेऊन टाकली़ कचरा फेकून परतलेल्या दळवी यांच्या मुलांनी सुरसुरी मागितली असता सरिता यांनी कचºयाच्या डब्याशेजारी असलेल्या दागिन्यांच्या पिशवीत सुरसुरी असल्याचे सांगितले़ कचरा समजून दागिनेही फेकून आल्याचे लक्षात येताच दळवी पुन्हा संंबंधित ठिकाणी गेले, मात्र त्याठिकाणी कचºयाची गोणी नव्हती, कोणीतरी ती खत प्रकल्पात फेकून दिली होती़ त्यामुळे दळवी यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून दागिन्यांबाबत तक्रार केली़ लक्ष्मीपूजनाच्या दुसºया दिवशी खतप्रकल्पात रोजाने काम करणाºया गंगूबाई आसरुबा घोडे (५५, साठेनगर, गरवारेजवळील झोपडपट्टी, अंबड) व तिची मुलगी मुक्ता व सुनीता यांना कचरा वेचत असताना हा प्लॅस्टिकचा डबा व त्यातील सोन्या-चांदीचे दागिने सापडले होते़ कचरावेचक घोडे यांना दागिने मिळाल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार डी़ पी़ पाळदे, पोलीस नाईक ए़ ए़ शेख, पोलीस शिपाई डी़ बी़ बर्शिले, एस़ डी़ लांडे यांना मिळाली़ त्यांनी पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना सांगितल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक गावित व बेल्हेकर यांना चौकशीचे आदेश दिले़ या पथकाने गंगूबाई घोडे व मुक्ता घोडे यांची चौकशी केल्यानंतर दागिने सापडले असून, चोर समजतील म्हणून पोलिसांकडे दिले नसल्याचे सांगितले़ पोलिसांनी दिलेले दागिने, पावत्यांवरील मोबाइल क्रमांक व अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार यावरून हे दागिने दळवी कुटुंबाचे असल्याचे समोर आले़ सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दागिन्यांबाबत खातरजमा केल्यानंतर ते शुक्रवारी (दि़ ३) दळवी कुटुंबीयांना देण्यात आले़
कचºयात सापडले चक्क १४ तोळे सोन्याचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:22 AM